
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. वैशाली विनोद बोंबले तर उपसभापती म्हणून संजय अशोक लघाने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचे आमदार विलास भुमरे यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. निवडीची घोषणा होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भुमरे पिता–पुत्रांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जि.प.च्या ८ तर पं.स. च्या १७ जागा पटकावून दणदणीत यश मिळवले होते. यंदा पैठण पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला राखीव असल्याने शिवसेनेकडून अनेक महिला सदस्य सभापती पदासाठी इच्छुक होते. मात्र खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ढोरकिन पं.स. गणातून निवडून आलेल्या सौ. वैशाली विनोद बोंबले यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापती पदी रांजणगाव खुरी पं.स. गणातून निवडून आलेले संजय अशोक लघाने यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मंगळवारी (दि.१०) रोजी पैठण पंचायत समितीच्या सभागृहात आज ही निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी १० ते १२ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. निर्धारीत वेळेत सभापती पदासाठी वैशाली बोंबले यांचा तर उपसभापती पदासाठी संजय लघाने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, नायब तहसीलदार कैलास बहुरे व नायब तहसीलदार वैशाली कांबळे यांच्या उपस्थितीत निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी आमदार विलास भुमरे पाटील यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे नंदलाल काळे, रवींद्र काळे, आप्पासाहेब निर्मळ, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब लबडे, नंदकुमार पठाडे , दादा बारे, बाबुराव पडुळे, राजेंद्र मापारी, विजय गोरे, रेवन कर्डीले, दादासाहेब गलांडे, बद्रीनाथ बोंबले, रघुनाथ ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य नितिन तांबे, पांडुरंग औटे, सुभाष मुळे, नामदेव खराद, सतिष आंधळे, मिठु ननावरे, शेखर शिंदे, संजय थोरात, पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, अक्षय जायभाये, विक्रम भुजंग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



