
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात नवीन मॅमोग्राफी यंत्राचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि ओबीसी विकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात बोलताना मंत्री शिरसाट यांनी रुग्णालय
.
शिरसाट यांनी रुग्णालय प्रशासनाला आश्वस्त केले की, कर्करोग रुग्णालयातील कोणत्याही कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला शिवाजी सुक्रे यांच्याकडेही निधीची मागणी करण्यास सांगितले. घाटी आणि इतर ठिकाणच्या रुग्णालयांसाठी निधीच्या मागणीबाबत त्यांनी प्रशासनाला पूर्ण पाठिंबा दिला.
निधीची कमतरता पडणार नाही मी पाठीशी आहे
यावेळी शिरसाट यांनी कॅन्सर हॉस्पिटलमधील कुठल्याही कामासाठी निधी कमी पडणार नाही. आम्ही तुम्हाला निधी उपलब्ध करुन देवू. तसेच शिवाजी सुक्रे यांना देखील तुम्ही निधीची मागणी करा. तुम्ही प्रत्येक वेळी घाटी तसेच इतर ठिकाणी हॉस्पिटलसाठी निधीच्या मागणीचे पत्र देता. काळजी करु नका मी तुमच्या पाठीशी आहे. रुग्ण बरा होऊन हॉस्पिटलमधून जायला पाहिजे असा आमचा हेतू असतो. त्यामुळे तुम्ही पैशांची चिंता करु नका. तुम्हाला याआधीदेखील मी सांगितले आहे. पैशांसाठी काही अडले असे समजू नका. पैसे देणारे आम्हीच आहोत. आज कल हमारा नाम बहुत चल रहा हैं. पैशांची चिंता नाही. एखादी बॅग तुमच्याकडे पाठवून देऊ, असे मिश्किल वक्तव्य संजय शिरसाट यांनी यावेळी केले.
मला टार्गेट करण्याचा प्रयत्न
व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले, व्हिडिओ काय दाखवतोय माझे घर आहे. तुम्ही पाहतायत ते माझे घर आहे. माझे बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेले बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडिओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.