
कार पार्किंगच्या मुद्यावरून झालेल्या वादात एका दाम्पत्याने पोलिस ठाण्यात शिरून एका पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड पोलिस ठाण्यात घडली आहे. यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
.
गोकुळ कडुबा निकाळजे, उषा गोकुळ निकाळजे, कोमल गोकुळ निकाळजे व एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. मुळचे सिल्लोडच्या धावडा येथील असणारे हे कुटुंब सध्या छत्रपती संभाजीनगर येथील हनुमाननगर येथे राहते. पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक बाबू मुंडे हे शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास सिल्लोड शहरातील नीलम चौकात आपल्या कर्तव्यावर तैनात होते. तेव्हा चारही आरोपी कारमधून तिथे आले. त्यांनी रहदारीस अडथळा उत्पन्न होईल अशा पद्धतीने आपली कार उभी केली. त्यामुळे मुंडे यांनी त्यांना कार बाजूला लावण्याची विनंती केली.
त्यावर उषा निकाळजे व कोमल निकाळजे यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ गेली. त्यानंतरही पीएसआय बाबू मुंढे यांनी त्यांना कारमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे सांगत त्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी त्यांना तुला वर्दीचा माज आला आहे का? तुझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करून तुझा माज जिरवू का? असे म्हणत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचा थेट गळा पकडला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कार पुढील कारवाईसाठी पोलिस ठाण्यात आणली. तिथेही आरोपींनी गोंधळ सुरूच ठेवला.
यावेळी अचानक अल्पवयीन आरोपींना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत पीएसआय मुंढे यांचा गळा पकडला. तसेच पोलिस ठाण्यातील संगणक तोडण्याचा व दस्तऐवज फेकून देण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर बाबू मुंढे यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणी वरील चौघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित पीएसआयवर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3 दिवसांपूर्वी महिला पोलिसाला मारहाण
उल्लेखनीय बाब म्हणजे पोलिस ठाण्यातच पोलिसांचा गळा पकडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची ही 3 दिवसांतील दुसरी घटना आहे. गत बुधवारी सायंकाळी ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तिघांनी ठाणे प्रमुखांशी अर्वाच्च भाषेत संवाद साधत एका महिला पोलिस अंमलदाराचा गळा पकडून त्यांना मारहाण केली होती. त्यात महिला पोलिस अंमलदार चक्कर येऊन खाली पडल्यामुळे बेशुद्ध झाल्या होत्या.
यासंबंधीच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलिसांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संबंधित महिलेने आणि तिच्यासोबत आलेल्या 2 नातेवाइकांनी महिला पोलिस कर्मचाऱ्याचा गळा दाबून तिला मारहाण केली. ही मारहाण इतकी भयानक होती की, महिला पोलिस कर्मचारी जागीच बेशुद्ध पडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या महिलेसह तिच्या दोन नातेवाइकांविरुद्ध सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
हे ही वाचा…
अमित ठाकरे यांनी घेतली आशिष शेलारांची भेट:शाळा, कॉलेजच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; कालच राज मुख्यमंत्र्यांना भेटले होते
मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात लगबग वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. विशेषतः सर्वच प्रश्नांचे उत्तर राज ठाकरे हेच असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात विविधांगी चर्चा रंगली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.