
Ashwini Bidre Murder: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणात अखेर निकाल लागला आहे. आरोपी अभय कुरुंदकरला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. तर, आरोपी क्रमांक दोन राजू पाटीलची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. पनवेल येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
14 जुलै 2016 रोजी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र यानंतर थेट दोन वर्षांनी म्हणजेच 2018 मध्ये हत्या झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक करण्यात आले होते. तसंच, आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. सात वर्षांपासून चार आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आज पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी होती. कोर्टाने आरोपी अभय कुरुंदकरला दोषी ठरवले असून एकाचा निर्दोष सुटका केली आहे.
अश्विनी बिद्रे प्रकरणात आरोपी क्रमांक 2 राजू पाटील यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. हत्येच्या कटात त्याचा काही संबंध असल्याचा पुरावा नसल्याने त्याची सुटका करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी अभय कुरुंदकरवर अपहरण, हत्या आणि पुरावे नष्ट करणे हे गुन्हे सिद्ध झाले आहेत.
अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर दोन वर्षांनंतर शोधमोहिम राबवली जाते, पुरावे गोळा करण्यात तपास अधिकारी अयशस्वी झाले, असं म्हणत कोर्टाने तपास यंत्रणाना फटकारले आहे. तर, मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना शिक्षा 11 एप्रिलला सुनावणार असल्याचं म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.