
खान्देश, नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली केळी आता नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्येही घेतली जात आहे. स्थानिक बाजारात केळीला कमी दर मिळत असला तरी केळीची निर्यात करून नफा कमावता येऊ शकताे हे शेतकरी अंबादास साेनवणे व राजेंद्र परदेशी यांच्यासह १२ शेतकऱ्यांन
.
सर्व १२ शेतकऱ्यांनी एकत्र येत केळी पिकाचा अभ्यास केला व थेट हैदराबादेतून १६ रुपये प्रति दराने जी-९ या प्रजातीचे रोपे आणली. एका एकरात साधारण १२५० रोपांची ठिबक सिंचन प्रणालीवर लागवड केली. ११ महिन्यांनी पिक काढणी याेग्य झाले. अनेक निर्यातदार कंपनींनी या क्षेत्रांची पाहणी करत या मालाची मागणी केली. त्यातील एका कंपनीने अंबादास सोनवणे, राजेंद्र परदेशी, लोकेश जाधव, महेश सोनवणे, जगदीश बोरसे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा माल जागेवर १५ रुपये प्रति किलोने खरेदी केला व थेट इराणला पाठवला. निर्यातीसाठीची प्रक्रिया बाॅक्स पॅकिंग करत पिंपळगाव येथे कंपनीच्या कोल्ड स्टोरेजवर पाठवली. तेथून मुंबईच्या जेएनपीटी बंदरावरून जहाजाच्या कंटेनरद्वारे केळी इराणला पाेहाेचवली जात आहे. ग्राहकापर्यंत हा माल २५ ते २८ दिवसांत पाेहाेचेल. निर्यातदार कंपनीने मालाच्या काढणीसाठी स्वतःचे अनुभवी कामगार पाठवले.
केळीचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन
जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत बागलाणमध्ये थंड हवामान आहे. अशा ठिकाणी केळीचे उत्पादन घेणे म्हणजे धाेका ठरू शकताे. पण शेतकऱ्यांनी थंडी सुरू हाेण्याच्या आधी काढणी करता येईल असे नियोजन केले व उत्पादन घेतले. निर्यातक्षम माल पिकविल्यामुळे शेतकऱ्याला एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळाले. एकरी दीड लाख खर्च वजा जाता तीन लाखांचा नफा झाला.
११ महिन्यात चांगला नफा पारंपरिक शेतीत कांदा, ऊस, टोमॅटो अशी पिके बागलाणमध्ये घेतली जातात. मात्र या पिकांत उत्पादन खर्चही निघत नाही. शिवाय १८ महिने शेती क्षेत्र अडकून राहते. त्याऐवजी पर्यायी पीक म्हणून ११ महिन्यात खर्च जाऊन ३ लाखांपर्यंत नफा मिळत असल्याचे शेतकरी अंबादास साेनवणे यांनी सांगितले. या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती. मोबाइल नंबर : 9423484030
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



