
Piyush Goyal apology: भाजपा नेते पियुष गोयल यांच्यावर प्रफुल्ल पटेल यांच्यासंदर्भात विधान केल्यानंतर माफी मागण्याची वेळ आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा दावा पियुष गोयल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आणि दावा फेटाळण्यात आला आहे. तसंच प्रफुल्ल पटेल यांनीही पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली होती. यानंतर आता पियुष गोयल यांनी जाहीर माफी मागितली आहे.
पियुष गोयल यांची जाहीर माफी
“एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली की श्री. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. मी दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल माफी मागतो,” असं त्यांनी म्हटलं आहे.
एक वरिष्ठ पत्रकार ने मुझे गलत जानकारी दी थी कि श्री प्रफुल पटेल राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष चुने गए हैं। जानकारी की पुष्टि किये बिना मैंने मीडिया में कुछ बयान दिया था किंतु बाद में पता चला जानकारी गलत है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजीतदादा…
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 1, 2026
पियूष गोयल यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
दोन्ही राष्ट्रवादींच्या संभावित विलीनीकरणाबाबत विचारलं असता पियूष गोयल यांनी सांगितलं की, “मला स्वत:ला तसं होताना दिसत नाही. मला वाटत नाही तसं काही होईल. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचा भाग म्हणून खूप चांगली कामगिरी केली. नेतृत्व आधी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली आहे. शरद पवारांनी लोकांचा विश्वास आणि मतं गमावला असल्याने त्यांना युतीसाठी आमंत्रण मिळेल असं मला वाटत नाही. पिंपरी आणि पुण्यात एकत्र आलेले असतानाही त्यांचा पराभव झाल्याचं पाहिलं. जर अजित पवारांनी महायुतीशी युती केली असती तर ते पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील विजयाचा भाग असते. शरद पवारांशी युती करणं मोठी चूक होती आणि आता हे त्यांच्या पक्षातील लोकांना कळलं आहे”.
VIDEO | PTI Exclusive: In an interview with PTI CEO & Editor-in-Chief Vijay Joshi, Union Minister Piyush Goyal, when asked about Sunetra Pawar taking oath as Maharashtra’s Deputy Chief Minister following the tragic death of Ajit Pawar, says, “We have an alliance with the NCP… pic.twitter.com/053Hxv7Edj
— Press Trust of India (@PTI_News) January 31, 2026
“स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील निकालात शरद पवारांशी युती केल्याने त्यांचा मोठा पराभव झाल्याने मला युती होईल असं वाटत नाही. तशी कोणतीही शक्यता नाही. काँग्रेसकडे पाहा….ते ज्यांच्याशी युती करतात तो पक्ष हारतो. आरजेडीचं तसंच झालं आहे. महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतर तिघेही निवडणुकीत हारले. त्यांची प्रसिद्धी आता उरलेली नाही,” असंही त्यांनी म्हटलं.
प्रफुल्ल पटेलांनी फेटाळला दावा
सुनील तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचे मी पाहिले आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे.
I have noted few reports circulating in the media regarding my appointment as the National President of the Nationalist Congress Party. I wish to state with absolute clarity that these reports are totally baseless and lack any truth.
The Nationalist Congress Party is a…
— Praful Patel (@praful_patel) February 1, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही एक लोकशाही मूल्यांवर आधारलेली संस्था आहे. इतक्या महत्त्वाच्या पदाबाबतचा कोणताही निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेतृत्व, आमदार, समर्पित पदाधिकारी यांच्याशी सखोल सल्लामसलत करून तसेच पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि सदस्यांच्या भावना व सामूहिक इच्छेचा आदर राखूनच घेतला जातो. राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा निर्णयांसाठी ठरलेली आणि संस्थात्मक प्रक्रिया आमच्याकडे आहे, आणि त्याच प्रक्रियेच्या आधारेच कोणताही निर्णय घेतला जातो असंही त्यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



