
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुणे कोरेगाव पार्क परिसरातील सरकारी जमीन खरेदी प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. असं असताना अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.
यावेळी झी 24 तासचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी प्रश्न विचारला की, त्या जागेवर पझेशनचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळतेय? त्यावेळी पवार म्हणाले की, पझेशन झालंय का? नाहीना. यावर प्रतिप्रश्न करण्यात आला की, …पण, दादा प्रयत्न तर झाला होता ना. त्यावर अजित पवार म्हणाले की, प्रयत्नांअंती परमेश्वर…असं म्हणताच एकच हशा फुटला.
अजित पवार आपल्या शाब्दिक कोटी आणि मिश्किल बोलण्यासाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे यावेळी देखील त्यांनी अजित पवार यांनी वेळ मारून नेली आहे.
लिटिगेशनच्या जागांच्या प्रॉपर्टी कार्डवर भूमीअभिलेख कार्यालयातून इतर हक्कातली नावं मुख्य हक्कात चढवायची, अशी काही टोळ्याची मोडस ऑपरेडी आहे, हे कसं थांबवणार? यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही म्हणता ते माझ्याही कानावर आलंय म्हणूनच चौकशी समितीत अशा गैर प्रकारांना यापुढे कसा आळा घालता येईल? यावरही उपाययोजना करायला सांगितले आहे.
मग घोषणा कशी केली?
काल तुम्ही घोषणा केलीत की, जमीन खरेदी व्यवहार रद्द झाला पण प्रत्यक्षात तसं झालेलंच नाही. यावर अजित पवार उत्तर देताना म्हणाले की, मला तशी माहिती मिळाली, म्हणून बोललो, आता सुट्टी, उद्या सुट्टी, ठिक आहे, जे काही असेल ते चौकशीत समोरच येईलच. असं म्हणत अजित पवारांनी याविषयावर बोलणं टाळलं.
झी 24 तासच्या पत्रकारांचं कौतुक
जमीन खरेदी गैरव्यवहारातील लेटीगेशन टोळ्यांची नेमकी मोडस ऑपरेंडी काय हे, अजित पवारांच्या लक्षात आणून देताच, त्यांनी होय, मी या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या विकास खरगेंना हे सांगणार हे की, अभ्यासू पञकारांनी पार खोलात जाऊन यासंबंधीचे प्रश्न मला विचारलेत, त्यावरही नक्की विचार करा. तुमचं खरंच कौतुक हे याबद्दल. अशी मिश्किल टिपण्णी ही अजित पवारांनी यावेळी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



