
Central Railway Timetable : मध्य रेल्वेने गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. मध्ये रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचा सर्वात मोठा परिणाम मुंबईसह लातूर, नागपूर आणि अमरावतीच्या प्रवाशांवर होणार आहे. मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे की, अनेक मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळा तर काही गाड्यांचे तर टर्मिनलदेखील बदल केले गेले आहेत. अनेक गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांमध्ये बदल करण्यात आले आहे. मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं की, हे नवीन वेळापत्रक 13 आणि 14 एप्रलिपासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकाचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नागपूर, हुबळी, बेंगळुरू, लातूर, सोलापूर, बिदर तसंच बनारस या मार्गांवर पाहिला मिळणार आहे. हे नवीन वेळापत्रक 14 एप्रिलपासून (दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेस) आणि 15 एप्रिलपासून (गरिब रथ आणि पुणे-नागपूर एक्स्प्रेस) लागू होणार आहे. त्यामुळे या मार्गावर उन्हाळ्यात प्रवास करताना प्रवाशांनी तिकीट काढताना नवीन वेळापत्रकाची नोंद घ्यावी.
कोणत्या गाड्यांमध्ये बदल झाला आहे पाहा!
22177 सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस आता सीएसएमटीहून 00:15 वाजता सुटणार असून ती वाराणसीला 03:45 वाजता पोहोचणार आहे. पूर्वी, ही ट्रेन 00:10 वाजता निघायची आणि 03:35 वाजता वाराणसीला दाखल व्हायची.
ट्रेन क्रमांक 22178 बनारस-सीएसएमटी महानगरी एक्स्प्रेस वाराणसीहून 09:45 वाजेला प्रस्थान होणार असून सीएसएमटीला 11:40 वाजता आगमन करणार आहे. पूर्वी, ही गाडी वाराणसीहून 10:00 वाजता सुटायची.
त्याचप्रमाणे, 12111 सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून रात्री 20:05 या वेळेऐवजी आता 20:50 वाजता सुटणार आहे.
तर ट्रेन क्रमांक 12289 सीएसएमटी – नागपूर दुरांतो एक्स्प्रेस देखील 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून 20:35 वाजता सुटणार आहे. पूर्वी ही गाडी 19:55 वाजता सीएसएमटीवरुन निघायची. ट्रेन क्रमांक 12290 नागपूर – सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस 14 एप्रिलपासून सीएसएमटीला 07:50 वाजता दाखल होणार आहे. पूर्वी ही ट्रेन 08:05 वाजता सीएसएमटीला यायची.
गाडी क्रमांक 17318 दादर-हुबळी एक्स्प्रेस दादरहून 20:05 वाजता निघणार आहे. पूर्वी ही ट्रेन 20:15 वाजता प्रस्थान करायची. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 11301 सीएसएमटी-बेंगळुरू एक्स्प्रेस देखील 14 एप्रिलपासून सीएसएमटीहून 07:55 वाजता सुटणार आहे. पूर्वी ती 08:10 वाजता प्रस्थान करणार आहे.
तसंच, गाडी क्रमांक 22108 लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस 13 एप्रिलपासून सीएसएमटीला 8:00 वाजता दाखल होणार आहे. पूर्वी ती 07:55 वाजता यायची. गाडी क्रमांक 12116 सोलापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस 06:30 वाजता आगमन करणार आहे. पूर्वी ती 06:35 वाजता दाखल व्हायची.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



