
पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय येथील जाहिरात कलेचे प्राध्यापक आणि साकेत कम्युनिकेशन्सचे आर्ट डिरेक्टर असलेल्या प्रा. रवी पवार यांना 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनामध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यातील रंग व रेखा आणि उपयोजित कला विभागातील कलाकारांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे याकरिता महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक उपक्रम म्हणून दरवर्षी कला संचालनालयामार्फत या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षी जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. सदर प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांच्या निवडक कलाकृतींना उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे गौरविण्यात येत असते. येत्या मार्च महिन्यात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रा. रवी पवार यांनाही यावेळी सन्मानित करण्यात येईल. रवी पवार यांनी उपयोजित कला विभागात सादर केलेल्या ‘सेव्ह ट्री सिरीज’ या जाहिरात कॅम्पेनला शासनाने प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार तब्बल 30 वर्षांनी अभिनव कला महाविद्यालयाकडे प्रा. रवी पवार यांच्या रूपाने आलेला आहे. रवी पवार यांनी याआधी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेले आहे. त्यांनी ग्राफिक डिझाईन आणि जाहिरात क्षेत्रात आपली सर्जनशीलता व कलात्मकता याद्वारे आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. राज्य कला प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या कला व सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण वारसा आहे. या क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



