
मुंबईतील मालाडमधील मालवणी भागात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय महिलेला (मुलीची आई) आणि तिच्या १९ वर्षीय प्र
.
आईकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल
रविवारी रात्री उशिरा मुलीला उपचारासाठी नागरी सरकारी रुग्णालयात आणले, तेव्हा ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आरोपी आईने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली. तिच्या मुलीला अपस्माराचा आजार असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंत डॉक्टरांनी तपासणीदरम्यान मुलीला मृत घोषित केले.
पुढील तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांना मुलीच्या गुप्तांगावर जखमांच्या खुणा आढळल्या आणि त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवले. वैद्यकीय तपासणीच्या आधारे, पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकरावर बीएनएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. आरोपी महिला आणि आरोपी मुलगा कथितपणे प्रेमसंबंधात होते.
आरोपीने कृत्य केले तेव्हा अल्पवयीन मुलगी वेदनेने ओरडली
तीन वर्षांपूर्वी आरोपी महिला गरोदर असताना तिचा पती तिला सोडून गेला होता. तेव्हापासून ही महिला तिच्या आईच्या घरी राहत होती. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने अडीच वर्षांच्या मुलीवर तिच्या आईसमोर बलात्कार केला. ती मुलगी वेदनेने ओरडत होती आणि नंतर तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाच्या आधारे, पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकरावर बीएनएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 70, 64, 65 (2), 66, 103, 238, 3 (5) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 6, 10, 21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
वैद्यकीय अहवालातून सत्य झाले उघड
वैद्यकीय अहवालात असे दिसून आले की, चिमुकलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. सखोल चौकशीनंतर, पोलिसांनी मुलाच्या आईला आणि तिच्या प्रियकराला POCSO कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली अटक केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.