
पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर जातीयवादाचा गंभीर आरोप करणाऱ्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाचे आणि त्याला पाठिंबा देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे दावे तथ्यहीन असल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. प्रेम बिऱ्हाडे आणि प्रकाश आंबेडक
.
लंडनमध्ये नोकरी मिळालेल्या प्रेम बिऱ्हाडे या विद्यार्थ्याने पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर जातीय भेदभावाचा आरोप केला होता. “मी दलित असल्याने माझ्या शिक्षणाची पडताळणी कॉलेजने नाकारली, त्यामुळे मला लंडनमधील नोकरी गमवावी लागली, असा दावा प्रेम बिऱ्हाडेने केला होता. प्रेम बिऱ्हाडेच्या आरोपांना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र आता मॉडर्न कॉलेज प्रशासनाने या सर्व आरोपांना ठामपणे फेटाळून माहितीचा सविस्तर खुलासा केला आहे.
नेमके काय म्हणाले श्यामकांत देशमुख?
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्यामकांत देशमुख यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना महाविद्यालयाची बाजू मांडली. ते म्हणाले, “प्रेम बिऱ्हाडे आणि प्रकाश आंबेडकर यांचे दावे निराधार आहेत. प्रेमने आमच्याकडे तीन वर्षांचा बीए अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्यानंतर तो यूकेला गेला.”
प्रेमच्या नोकरीबाबत संभ्रम निर्माण केला जातोय
देशमुख यांनी स्पष्ट केले की, प्रेम बिऱ्हाडे यूकेमध्ये शिक्षण घेत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्याला त्याची गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र, उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र आणि त्याने मागणी केलेले शिफारसपत्र देखील दिले आहे. त्यानंतरही नोकरी गेली असा दावा केला जातो, तो नोकरीपासून वंचित राहतोय की काय असा संभ्रम निर्माण केला जात आहे, परंतु असे अजिबात नाही.
कागदपत्र पडताळणीवर स्पष्टीकरण
देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, प्रेमला थेट नोकरी लागली नव्हती, तर ही नोकरी मिळवण्यासाठी थर्ड पार्टीकडून कागदपत्र पडताळणी सुरू होती. कागदपत्र पडताळणीसाठी 30 सप्टेंबर रोजी पहिला ईमेल मिळाला होता, पण त्यात कोणतीही डेडलाईन दिली नव्हती. म्हणजे अमुक तारखेपर्यंत ही सगळी कागदपत्रं पडताळून आम्हाला द्या, असे सांगितले नव्हते. यूकेमधील एव्हिएशन (Heathrow Airport) संबंधित नोकरीसाठी कंपनीला पाच वर्षांचे ‘स्क्रीनिंग’ अपेक्षित होते. प्रेम बिऱ्हाडे आमच्याकडे फक्त तीन वर्षांसाठी विद्यार्थी होता, त्यामुळे आम्ही तीन वर्षांचीच माहिती दिली.
त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कंपनीने पर्सनल रेफरन्स सोल्युशन नावाच्या एका थर्ड पार्टी कंपनीला पडताळणीची कामगिरी सोपवली होती. त्यामध्ये एव्हिएशन अॅक्ट व एव्हिएशन मेरिटाइम अॅक्टचा उल्लेख केला होता. कागदपत्रांच्या बाबतीत मोठी सुरक्षितता व गोपनीयता बाळगणं आणि तशीच माहिती उपलब्ध करून देणे गरजेचे होते जी आम्ही कंपनीला पुरवली आहे.”
प्रेम बिऱ्हाडेची नोकरी गेलीय असे म्हणता येणार नाही
श्यामकांत देशमुख म्हणाले, आम्हाला 9 ऑक्टोबर रोजी दुसरा मेल आला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा पाच वर्षांच्या स्क्रीनिंगबाबत विचारले होते. आम्ही तीन वर्षांचे स्क्रीनिंग पुरवले आणि पोलिसांशी पत्रव्यवहार सुरू केला. 14 ऑक्टोबर रोजी आम्ही त्यांना बोनाफाइड सर्टिफिकेट व कंपनीने मागितलेला प्रोफार्मा भरून ई-मेल केला. या सगळ्यात प्रेम बिऱ्हाडेचा जॉब गेलेला नाही. काल सकाळी 11.31 वाजता आम्हाला एक ई-मेल आला आहे. त्यात त्यांनी आम्हाला सांगितले की माहिती फर्निश करा, जेणेकरून पडताळणीनंतर प्रेमला जॉब देता येईल. आम्ही सगळी कागदपत्रे दिली आहेत. दोन वर्षांच्या स्क्रीनिंगची माहिती पोलिसांकडून आम्हाला मिळाली तर आम्ही ती देखील देऊ. या सगळ्यात प्रेमचा जॉब गेलाय असे म्हणता येणार नाही.
हे ही वाचा…
मॉडर्न कॉलेजचे कृत्य जाती – आधारित भेदभावाचे:प्रकाश आंबेडकरांचा आरोप; प्रेम बिऱ्हाडे नामक दलित विद्यार्थ्याला शिफारस पत्र नाकारल्याने संतापले
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजने दलित विद्यार्थ्याला नाकारलेले शिफारस पत्र हे जाती-आधारित भेदभावाचे कृत्य असल्याचा आरोप केला आहे. प्रेम बिऱ्हाडे नामक विद्यार्थ्याचे महाविद्यालयात शिकत असतानाचे वर्तन असमाधानकारक होते, तर मग यापूर्वी त्याला बोनाफाईड सर्टिफिकेटसह 3 शिफारसपत्रे का देण्यात आली? आत्ता त्याला इंग्लंडमध्ये नोकरी लागल्यानंतर त्याला शिफारस पत्र का नाकारण्यात आले? महाविद्यालयाची ही भूमिका जाती-आधारित भेदभावाची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.