
Mumbai To Goa in 4 hours: गौरी-गणपतीच्या दिवसांत कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप अधिक असते. चाकरमान्यांची संख्या पाहता अनेकदा रेल्वेचे तिकीटदेखील मिळत नाही. त्यामुळं प्रवाशांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो. मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्यापही रखडलेले आहे. अशावेळी रस्तेमार्गे प्रवास करणे म्हणजे खड्ड्यांचा अधिक त्रास होतो. तसंच, वाहतुककोंडीमुळं कित्येक तास प्रवासातच अडकून बसावं लागतं. चाकरमान्यांची ही ससेहोलपट थांबवण्यासाठी लवकरच प्रवासाचा नवा मार्ग खुला होणार आहे. या नव्या प्रवासी मार्गामुळं नागरिकांना अवघ्या चार तासांत कोकण गाठता येणार आहे.
गणपतीत कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. गणपतीत चाकरमान्यांना आता समुद्रामार्गे प्रवास करता येणार आहे. चाकरमान्यांना कमी वेळेत गावी पोहोचवण्यासाठी मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. यामुळे अवघ्या साडेचार तासांत मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरी गाठता येणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. हायटेक यंत्रणा असलेल्या M टू M या बोटीमार्फत कोकणात प्रवास करता येणार आहे.
एम टू एम बोट येत्या 25 मेपासून मुंबईतील भाऊचा धक्का येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून परवडणाऱ्या दरात जलवाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध करुन दिला जात आहे. या करता एम टू एम बोट सेवा प्रायोगित तत्वावर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हायटेक यंत्रणा असलेल्या एम टू एम या बोटीमार्फत जलवाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबईतील माझगाव डॉकयेथून प्रवास सुरू होईल. जवळपास साडेचार तासांत कोकणातील मालवण, विजयदुर्ग तर तीन तासांत रत्नागिरीपर्यंत पोहोचता येणार आहे. लवकरच या सागरी प्रवासाचे तिकीट दर निश्चित केले जाणार आहेत. चाकरमान्यांना परवडतील असेच दर निश्चित केले जाणार आहेत.
कशेडी बोगदा सुरू
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यात 15 मे रोजी वीजपुरवठा सुरू झाल्याने तो पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित झाला आहे. हा घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून 15 मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यादृष्टीने बोगद्याचे काम सुरू होते. आता अखेर बोगद्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. या बोगद्यामुळं 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या 10 ते 15 मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.