
Vidya Pratishthan Girls Hostel: अजित पवारांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सामान्य नागरिक, कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत साऱ्यांनीच दु:ख व्यक्त केलंय. यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या गर्ल हॉस्टेलमधील मुलींनी झी 24 तासशी संवाद साधला. खेड्या पाड्यातील मुलींना येथे शिक्षण मिळते. अजित दादांचे कर्तृत्व आणि आठवणी सांगताना मुली भावूक झालेल्या दिसल्या. काय म्हणाल्या मुली? जाणून घेऊया.
मी सोलापूरची आहे. पुण्याला पाठवायला घरच्यांना भीती वाटते. पण बारामती म्हणजे सुरक्षा असं पालकांना वाटतं. आज आमचा दादा गेला. आमच्या लाडक्या बहिणींना पोरका करुन गेला. अजित दादांचे उपकार आम्ही विसरु शकत नाही, असे एका विद्यार्थीनीने सांगितले.
माझं इथे येण्याचे कारण पवार कुटूंब आहे.आम्ही शिक्षणासाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये आलोय. अजित दादांना मी दोनवेळा भेटलोय. दादांना कोणाची तर नजर लागलीय. पहाटे 5 वाजल्यापासून दादांना काम करताना आम्ही पाहीलंय. दादांचा आदर्श घेऊन पुढे जायचंय, हे आम्ही ठरवलेल्याचं एक विद्यार्थीनी म्हणाली.
वैयक्तिक कोणाला भेटले नाही तर त्यांचं लक्ष सगळीकडे असायच. आम्ही आमचा बाप माणूस गमावलाय. आता आमच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न आम्हाला पडल्याचे विद्यार्थीनी सांगतात. आमचा बाप माणूस गेलाय, अशी भावना विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थीनींनी व्यक्त केलीय. मुलींना सुविधा मिळण्यासाठी त्यांनी खूप केलं. एअरपोर्टचा रस्ता त्यांनी चांगला केला. विद्या प्रतिष्ठानसाठी खूप केलय. दादा नाहीय यावर विश्वास बसत नाहीय. ह खूप धक्कादायक आहे. ही दुखद घटना बारामतीसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याचे आणखी एका विद्यार्थीनीने झी 24 तासशी बोलताना सांगितले.
विद्या प्रतिष्ठान गर्ल्स हॉस्टेल कोणी सुरु केले?
बारामतीतील विद्यानगरी परिसरात असलेले हे मुलींसाठीचे निवासी वसतिगृह आहे. विद्या प्रतिष्ठान ही शरद पवार साहेबांनी सुरू केलेली शैक्षणिक संस्था असून, त्यात अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांसारखे विश्वस्त आहेत. हे हॉस्टेल प्रामुख्याने खेडे-खोर्यांतील गरीब कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित आणि परवडणारे निवासस्थान पुरवते. यात प्राथमिक ते अभियांत्रिकी, कला, वाणिज्य अशा विविध शाखांतील विद्यार्थिनी राहतात. हॉस्टेलमध्ये स्वच्छ खोल्या, स्वयंपाकघर, अभ्यासिका आणि सुरक्षा व्यवस्था असते, ज्यामुळे मुली निर्भयपणे शिकू शकतात.
हे हॉस्टेल कसे चालते आणि सुविधा काय?
हे वसतिगृह संस्थेच्या नियमांनुसार चालते. मुलींना प्रवेश मेरिट आणि गरजेनुसार मिळतो. येथे भोजन, निवास, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा आणि अभ्यासासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध असते. काही ठिकाणी शुल्क कमी किंवा माफ असते, विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास मुलींसाठी. हॉस्टेलमध्ये शिस्त, अभ्यासाचे वेळापत्रक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात. यामुळे मुली एकत्र राहून शिकतात, एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि घरापासून दूर राहूनही सुरक्षित वाटतात.
खेडोपाडीच्या मुलींना शिक्षण मिळण्यासाठी कसे मदत होते?
गावांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधी कमी असतात. बारामतीत येणाऱ्या मुलींना राहण्याची चिंता असते. हे हॉस्टेल त्यांना घरासारखे वातावरण देते, जेणेकरून त्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतात. अनेक मुलींना मोफत किंवा नाममात्र शुल्कात जागा मिळते. यामुळे त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक भार येत नाही. परिणामी, गावातील मुलींना इंजिनीअरिंग, डॉक्टर, शिक्षक, अधिकारी होण्याची संधी मिळते आणि त्या स्वावलंबी होतात.
अजित दादांचे योगदान काय?
अजित पवार (अजित दादा) हे विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त असून, बारामतीच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी हॉस्टेलच्या विस्तारासाठी, सुविधा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्था वाढली आणि अनेक खेड्यातील मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. अजित दादांनी अनेकदा हॉस्टेलला भेटी दिल्या, समस्यांचे निराकरण केले आणि मुलींना प्रेरणा दिली. यामुळे ‘अजित दादांमुळे शिक्षण मिळालं’ अशी भावना ग्रामीण भागात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



