
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ अशी ओळख असलेले बाबा आढाव यांचा 95 वा वाढदिवस शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. बाबा आढाव यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांची सेवा केली. त्यांचा 100 वा वाढदिवस पण मोठ्या उत्साहात साजरा क
.
बाबा आढाव यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, 95 वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो. बाबा आढाव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी वेचले. या वयात बाबा आढाव सक्रियपणे काम करत आहेत. आजही ते विधायक कामे करत आहेत. अन्याय अत्याचार विरोधात लढत आहेत. सामान्य माणसांचे ओझे हलके करण्याचे काम करत आहेत. आपण सर्वांसाठी ते मोठा आदर्श आहे.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थिरता कशी येईल, त्याचा सातत्याने विचार करत बाबा काम करत राहिले. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी काम करत त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी नेहमी सामान्य माणसांचे हितच पाहिले आहे. कष्टकरी, कामगार यांच्यासाठी ते काम करत राहिले आहेत. उपेक्षित समाजातील लोकांना संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ते काम करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात बाबांनी मोठे कार्य केले. आम्ही लोकांनी त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले आहे.
बाबा आढाव यांनी त्यांचे आयुष्य समाजासाठी दिले आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा देतो. तसेच लवकरच त्यांचा शंभरावा वाढदिवस आपण साजरा करु, असे शरद पवार यांनी म्हटले. दरम्यान, बाबा आढाव यांनी 1953 सालापासून सामाजिक चळवळीत भाग घेतला. त्यांनी हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, कागद-काच- पत्रा कष्टकरी पंचायत, बांधकाम कामगार पंचायत, टेम्पो पंचायतीच्या माध्यमातून कष्टकराऱ्यांसाठी काम केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.