
वैभव बालकुंदे, झी 24 तास लातूर : लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड या गावातील ग्रामस्थांना वीज बिलाचा मोठा झटका बसला आहे. रामलिंग मुदगड च्या गावकऱ्यांना आलेल्या वीजबिलाची रक्कम पाहिलीत तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण या गावकऱ्यांना 50 हजारांपासून ते थेट दीड लाखांपर्यंत वीजबिल आलंय. वीजबिलावरील ही रक्कम गावकऱ्यांना मोठा मनस्ताप झाला आहे.
लातूर जिल्ह्यातल्या रामलिंग मुदगड या गावचे गावकरी संताप व्यक्त करत आहेत. या गावकऱ्यांना महावितरणने 50 हजारांपासून ते तब्बल दीड लाखांपर्यंत वीज बीलं पाठवून झटका दिला आहे. एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या आजोबांना तब्बल दीड लाखांचं बील देण्यात आला आहे.
आणि विशेष म्हणजे ही हजारोंची बिलं देताना गावकऱ्यांना वीज चोर ठरवण्यात आल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. रामलिंग मुदगड गावातील तब्बल 200 वीज ग्राहकांना महावितरणने हा झटका दिला आहे. विजेचा एवढा वापर नसताना एवढ्या मोठ्या रकमेची बिलं आलीच कशी असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. त्यातच ही भल्या मोठ्या रकमेची वीजबिलं देताना महावितरणने वीज चोरी देयक असा उल्लेख केल्यानं गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. महावितरणने थेट 200 जणांना चोर ठरवल्याने गावाची बदनामी झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे
महावितरणने गावकऱ्यांच्या या तक्रारींची दखल घेत मीटर रिडींग प्रमाणे बील आकारणी करावी. दिलेली बिलं कमी करावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात अद्याप महावितरणची बाजू समोर आलेली नाहीय.. आता महावितरण या गावकऱ्यांचं म्हणण ऐकून घेऊन या वाढीव वीज बिलाबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.