digital products downloads

बायकोचा एक्स बॉयफ्रेण्ड 4-5 जणांसोबत आला अन् भररस्त्यात नवऱ्याला गाडीत कोंबलं…एखाद्या पिक्चरपेक्षाही भयंकर थरार, पाहा VIDEO

बायकोचा एक्स बॉयफ्रेण्ड 4-5 जणांसोबत आला अन् भररस्त्यात नवऱ्याला गाडीत कोंबलं…एखाद्या पिक्चरपेक्षाही भयंकर थरार, पाहा VIDEO

Nashik Crime : मुंबई असो किंवा पुणे…आजकाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. पुण्यात आयुष कोमकर खुनेनंतर आंदेळकर गँगवॉर समोर आले आहे. ही घटना ताजी असताना बुधवारी रात्री उशिरा अचानक सर्वसामान्यावर गोळीबार करण्यात आला. आता नाशिकातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. सातपूर परिसरातील असलेल्या त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरी जवळ हा थरारक व्हिडीओ आहे. ज्यामध्ये दिवसाढवळ्या एका कारमध्ये 4 – 5 जण आलेत आणि त्यांनी तरुणाचा मोबाईल ओढून घेतला. त्यानंतर त्याला बळजबरीने कारमध्ये कोंबताना दिसून आलेत. (Nashik Crime Wife ex boyfriend came with 4 5 people kidnapping her husband into the car Maharashtra News)

Add Zee News as a Preferred Source

मिळालेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर 2025 ला दुपारी 2 वाजता ही घटना घडली आहे. तेजस ज्ञानेश्वर घाडगे हा हिंदू सोसायटीसमोरील एका टपरीवर मित्र सौरभ आहेर आणि त्याच्या वडिलांसोबत चर्चा करत होता. अशातच पत्नीचा लग्नाआधीची एक्स बॉयफ्रेण्ड आपल्या काही मित्रांसोबत आला आणि त्याने तेजसला अपहरण केलं. पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड गिरीश शिंगोटे याचा मित्र शैलेश कुवर ऊर्फ बंटी ,अक्षय पवार आणि काही मित्रांसोबत स्विफ्ट गाडी घेऊन तेजला अपहरण करण्यासाठी आले होते. 

थरारक व्हिडीओ पाहा

तेजसला बळजबरीने अपहरण करत असताना तिथे असलेल्या लोकांनी घटनेचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ पिक्चरमधील एखाद्या सीनपेक्षाही भयंकर थरार पाहिला मिळतो. तेजला गाडीत घालून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. ही कार काही अंतरावर गेल्यावर जीव वाचविण्यासाठी तेजसने उडी मारली. त्यानंतर रिक्षा करुन त्याने पपया नर्सरी सातपूरमधील पोलीस चौकी गाठली आणि पोलिसांना सर्व घटनेची तक्रार केली. 

दरम्यान जुन्या प्रेमसंबंधांमुळे हा हल्ल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. दरम्यान पोलीस मुख्य संशयित आरोपी गिरीश शिंगोटे आणि त्याचा साथीदारांचा शोध घेत आहेत. शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 

FAQ

1. नाशिक सातपूर अपहरण प्रकरण नेमके काय आहे?
नाशिकमधील सातपूर परिसरातील त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरीजवळ १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता दिवसाढवळ्या तेजस ज्ञानेश्वर घाडगे (वय २४, हिंदू सोसायटी रहिवासी) याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड गिरीश शिंगोटे आणि त्याचे साथीदारांनी हे केले. तेजसला गाडीत कोंडून मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाला.

2. अपहरण कसा घडला?
तेजस मित्र सौरभ आहेर आणि त्याच्या वडिलांसोबत टपरीवर उभा असताना गिरीश शिंगोटे आणि साथीदार (शैलेश कुवर उर्फ बंटी, अक्षय पवार आणि इतर) स्विफ्ट कारने आले. त्यांनी तेजसचा मोबाईल ओढून घेतला आणि बळजबरीने कारमध्ये कोंडले. मारहाण करताना व्हिडिओ काढला गेला. कार काही अंतरावर गेल्यानंतर तेजसने जीव वाचवण्यासाठी उडी मारली आणि रिक्षाने पपया नर्सरीतील पोलिस चौकी गाठली.

3. अपहरणाचे कारण काय आहे?
जुन्या प्रेमसंबंधांमुळे हा हल्ला झाला. तेजसची पत्नी आणि गिरीश शिंगोटे यांच्यात लग्नाआधी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही संपर्क राहिल्याने वैर वाढले. पोलिसांना प्राथमिक अंदाज प्रेम-संबंधातील वैराचा आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp