
Pune Crime News: पुण्यात एक खळबळजनक घटना घडली होती. पतीनेच पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले होते. धक्कादायक म्हणजे, मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरुन पत्नीचा मृतदेह घेऊन फिरताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतरच ही घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीची हत्या का केली याचे गूढ अखेर उकलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद होत होते. घटनेच्या दिवशी आरोपीने त्याच्या वडिलांना काही पैसे दिले होते. ते पत्नीला खटकले होते. सासऱ्यांना पैसे का दिले, म्हणत दोघांमध्ये मोठे भांडण झाले. त्यातूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. पत्नीने तसा प्रयत्नदेखील केला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा चिडलेल्या पतीने रागाच्या भरात तिचा गळा दाबला आणि त्यातूनच तिचा मृत्यू झाला. काहीवेळाने भानावर आल्यानंतर आरोपीला कळून चुकले की त्याच्याहातून गुन्हा घडला. दाम्पत्याच्या ८ वर्षाच्या मुलासमोरच हा सर्व प्रकार घडला होता.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घाबरला होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मित्राची दुचाकी घेतली. त्यानंतर एका ब्लँकेटमध्ये पत्नीचा मृतदेह गुंडाळला आणि स्कुटीवरुन घेऊन जात होता. सातारा रोड येथून जात होता. तेव्हा आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसानी आरोपीला हटकले. दुचाकीवर गुंडाळलेल्या कपड्यातून पोलिसांना पाय दिसले. तेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा एका महिलेचा मृतदेह आढळला. त्या आरोपीने पत्नीचा मृतदेह तिथेच टाकून पळ काढला. मात्र पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश आले आहे. पोलिस आरोपीच्या घरीदेखील चौकशीसाठी गेले होते. तिथे त्यांना त्यांचा 8 वर्षांचा मुलगा सापडला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने घडलेला सगळा प्रसंग सांगितला आहे. आई-वडिलांच्या भांडणातून हा सगळा प्रकार झाल्याचं त्यानं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीचे मुळगाव उत्तरप्रदेश येथील आहे.
अंदाजे नऊ वर्षांपूर्वी राकेश आणि बबीता यांचा प्रेमविवाह झाला मूळचे यूपी मधील रहाणारे हे पती-पत्नी कामासाठी काही वर्ष दिल्लीत राहिले त्यानंतर दीड वर्षापूर्वी ते कामासाठी पुण्यातील धायरी परिसरात राहत होते. सोबत आठ वर्षाचा मुलगा आहे. आयुष्याची नवी सुरुवात केलेले ही कुटुंब मिळल ते काम करून आपले पोट भरत होते. मात्र पैशाची कमतरता असल्याने नेहमी त्यांच्यात वाद होत होत. काल रात्रीही ही सासर्यांचा फोन आला आणि पैशाची मागणी केली त्यावर पुन्हा या दोघांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान बबीताने फाशी घेण्याचाही प्रयत्न केला हे पाहून राकेशला राग अनावर झाला आणि त्यानं पत्नी बबीताचा गळा दाबला त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.