
पुणे जिल्ह्यातील हायप्रोफाईल बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक वळण आले आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन जागांची निवडणूक ऐनवेळी स्थगित करण्यात आली आहे. भाजपच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने न्यायालयात धाव घेतली होती. न्
.
नेमके प्रकरण काय?
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे नेते सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी बारामती सत्र न्यायालयात धाव घेतली होती. विशेष म्हणजे, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अर्ज सादर करतानाचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आणि नैसर्गिक न्यायाचे तत्त्व लक्षात घेऊन न्यायालयाने प्रशासनाला हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या आदेशाने चक्रे फिरली
न्यायालयाच्या निकालाने भाजपला मोठा दिलासा मिळाला असून, बुधवारी (26 नोव्हेंबर) या दोन्ही उमेदवारांचे अर्ज नव्याने दाखल करून घेण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी तातडीने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, प्रभाग 13 (ब) आणि 17 (अ) या दोन जागा वगळून उर्वरित निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडणार आहे.
आता पुढे काय?
न्यायालयाच्या आदेशानुसार अर्ज स्वीकारले असले, तरी त्यांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम आणि आदेश मागवण्यात आले आहेत. आयोगाचे निर्देश आल्यानंतरच या दोन जागांसाठीचे वेळापत्रक जाहीर होईल. तोपर्यंत या प्रभागांमधील निवडणूक स्थगित राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, आता या दोन जागांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा…
फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू:भाजप आमदाराची विरोधकांना उघड धमकी, बावनकुळेंच्या उपस्थितीत केले विधान
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणांगण तापले असतानाच, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना नेत्यांच्या जिभेवरील ताबा सुटत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना थेट कापून काढण्याची भाषा वापरल्याने एकच खळबळ उडाली आहे. “हे सरकार देवेंद्र फडणवीसांचे आहे, ते गृहमंत्री आहेत आणि नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू,” अशी उघड धमकीच देशमुख यांनी भरसभेत दिली. विशेष म्हणजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



