digital products downloads

बालाजीरूपात दिसले राम, द्राक्षांची आरास, बुंदीचा प्रसाद‎: घराघरात अन् मंदिरांत जन्मोत्सव, 3 मिरवणुकांतून जयघोष, हजारो भाविक झाले नतमस्तक‎ – Chhatrapati Sambhajinagar News

बालाजीरूपात दिसले राम, द्राक्षांची आरास, बुंदीचा प्रसाद‎:  घराघरात अन् मंदिरांत जन्मोत्सव, 3 मिरवणुकांतून जयघोष, हजारो भाविक झाले नतमस्तक‎ – Chhatrapati Sambhajinagar News

.

उस्मानपुरा येथील राम मंदिरात तिरुपतीचे डेकोरेशन करण्यात आले. समर्थनगरातील श्रीसमर्थ राम मंदिरात दीड क्विंटल द्राक्षांची आरास करण्यात आली.

धनश्री पूर्णपात्रे, अश्विनी पूर्णपात्रे, दीप्ती पाटणी, तृप्ती पाठक यांनी तीन दिवसांत घोटीव कागद, स्टोन, लेसच्या वापरातून ११ इंचांचा टोप तयार केला. एमडीएफ शीटवर काचेचे तुकडे लावून पडदा तयार केला. रामनवमीच्या निमित्ताने मोहन पूर्णपात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. गेल्या वर्षी १२० किलोची बुंदी केली होती. यंदा २०० किलो बुंदीचे वाटप करण्यात आले. या वेळी काकडी, टरबूज, खरबूज, तसेच ३० किलो भाजलेली हरभऱ्याची डाळ वाटप करण्यात आली.

दिवसभरात १० हजार भाविकांनी दर्शन केले. अजिंक्य पूर्णपात्रे यांची उपस्थिती होती.श्रीराम यांच्या सुंदर मूर्तीसोबत भाविक मोबाइलमध्ये फोटो काढत होते. उस्मानपुरा येथील राम मंदिरात तिरुपतीचे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले. विशेष म्हणजे श्रीराम यांचा टोप महिलांनी हातांनी तयार केला आहे. रंगीत सजावट सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.

रामनवमी उत्सव समितीतर्फे राजाबाजार संस्थान गणपतीपासून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी लालबागच्या ब्रास बँडच्या ३५ जणांनी ८ ड्रम, ८ बीट्स, ४ हाफ ढोल, ३ ताशे, २ रोटो, एक की-बोर्ड, ७ भोंगे लावले होते. पथकाने श्रीराम जानकी बैठे हैं.., राम जी की निकली सवारी.., अंजनीच्या सुता.. अशा विविध प्रकारची गाणी सादर केली. कोळीवाड्याच्या ब्रास बँडच्या पथकाने विविध गीते सादर केली. यंदा समितीने देखावा सादर केला. यात अंबरनाथ, मुंबईहून हनुमान रथ ओढताना असा देखावा होता. सारथी म्हणून लक्ष्मण होते. मागे प्रभू श्रीराम सीतेसोबत आशीर्वाद देताना दिसत होते. हा देखावा लक्ष वेधून घेत होता. १० हजार राजगिरा लाडूंचे वाटप केले. मिरवणूक शहागंज, सिटी चौक मार्गे कुंभारवाडा अशी तीन किलोमीटरपर्यंत काढण्यात आली. या वेळी नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp