digital products downloads

बाल हक्कांसाठी ग्रामपंचायतींना विशेष प्रशिक्षण: मुलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी बाल पंचायत, बाल सभांवर भर – Chhatrapati Sambhajinagar News

बाल हक्कांसाठी ग्रामपंचायतींना विशेष प्रशिक्षण:  मुलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी बाल पंचायत, बाल सभांवर भर – Chhatrapati Sambhajinagar News



महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (MSCPCR), यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) आणि UNICEF यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामपंचायतींसाठी बाल हक्कांवरील दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 5 आणि 6 मार्च रोजी प्रथम अरोरा सेंटर फॉर एज्युकेशन (PACE) येथे ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि नाशिक या चार विभागांतील 20 जिल्ह्यांमधील 50 ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी असे सुमारे 97 प्रतिनिधी सहभागी झाले होते. ग्रामपंचायत विकास आराखड्यासारख्या स्थानिक नियोजन प्रक्रियेत मुलांचा सहभाग वाढवणे आणि त्यांच्या समस्यांचा समावेश करण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधींना प्रोत्साहन देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेतील सत्रांचे मार्गदर्शन यशदा येथील प्राध्यापक डॉ. राम पोले, UNICEF च्या सामाजिक धोरण तज्ज्ञ डॉ. देविका देशमुख, MSCPCR च्या प्रशासकीय अधिकारी वंदना जैन आणि CMCA, बेंगळुरूच्या डॉ. प्रिया नाम्बियार यांनी केले. गावातील निर्णय प्रक्रियेत मुलांचा आवाज प्रभावीपणे पोहोचावा यासाठी बाल पंचायत आणि बाल सभांच्या संकल्पनेचा प्रभावी वापर कसा करावा, यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला. MSCPCR चे माजी सदस्य ॲड. संजय सेंगर यांनी बाल संरक्षण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका स्पष्ट केली, तसेच CMCA ने बाल सभा राबविण्याचे अनुभव सादर केले. कार्यशाळेदरम्यान सहभागी प्रतिनिधींनी त्यांच्या ग्रामपंचायतींमधील अनुभव मांडले. नांदेड जिल्ह्यातील येरगी गावाच्या सरपंचांनी सांगितले की, त्यांच्या गावात बाल पंचायत सुरू केल्यानंतर परिसरातील इतर गावांनाही ही संकल्पना राबवण्याची प्रेरणा मिळाली असून बाल सहभागाला अधिक चालना मिळाली आहे.

ही कार्यशाळा महाराष्ट्रातील व्यापक बाल सहभाग उपक्रमाचा एक भाग आहे. यशदाकडून निवडलेल्या मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये बाल हक्क मॉड्यूल राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक प्रशासन अधिक बाल-प्रतिसादक बनवणे आणि बाल हक्कांबाबत सामुदायिक मालकी मजबूत करणे हा उद्देश आहे. या प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सरपंच योगेश कोठुळे, सविता निकुंभ, संजय गरड आणि जयश्री दिवेकर यांची उपस्थिती होती. तसेच राज वानखेडे (NIRDPR), जॉर्ज क्रिस्टो (युनिसेफ), सत्र समन्वयक सतीश वानखेडे, वैष्णवी अय्यर (युनिसेफ) आणि मधुकर मोरे यांनी कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp