
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. एवढंच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही भास्कर जाधवांनी व्यक्त केलीय. पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच विरोधी पक्षनेतेपदाचा दरारा महाराष्ट्राला दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हंटलंय.
शिवसेना का सोडली?
विषय असा आहे की आज मी किती आक्रमक आहे. आता माझ वय 68 आहे. खऱ्या शिवसेनेचा जो गुणधर्म आहे तो माझ्यामध्ये दिसतो. तोच आक्रमक पण, आपल्या नेतृत्वाबद्दलचा आदर, आपल्या नेतृत्वावर कोणी टीका केली तर त्याच्यावर तुटून पडण्याची प्रवृत्ती. पण सध्या मी कंट्रोल करतो. आज जर या वयामध्ये खरा शिवसैनिक असा असेल तर त्या काळात मी कसा असेल. कोकणामध्ये सगळयात जास्त शिवसेनेसाठी केसेस घेतलेला माणूस मी आहे. 2009 मध्ये मी लाल दिव्याची गाडी घेऊन कोर्टात जात होतो. त्या सर्व केसेस शिवसेनेच्या काळातील होत्या.
यामध्ये माझ्या वैयक्तिक केसेस नव्हत्या. पण तरी सुद्धा मला शिवसेना सोडावी लागली. याच दु:ख वाटणारच ना. त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं.
2004 मध्ये उमेदवारी का काढली?
2004 मध्ये मला रात्री फोन आला की, तुमची उमेदवारी काढण्यात आली आहे. मग पहिल्यांदा दोन वेळा मला का उमेदवारी दिली. जर त्यांनी माझी उमेदवारी काढली तर माझ म्हणणे काहीच नव्हते. कोणाला एक वेळा द्यावी, कोणाला चार वेळा द्यावी, हा पक्ष नेतृत्वाचाच अधिकार असला पाहिजे. अपेक्षा ऐवढीच असते की इतक्या दिवस काम करणाऱ्या माणसाशी चर्चा करून निर्णय घेयाला पाहिजे. ऐवढीच माझी अपेक्षा त्या काळात होती.
महाविकास आघाडीमध्ये मंत्री का केलं नाही?
मागच्या सर्व पार्श्वभूमी पाहून महाविकास आघाडीमध्ये असताना मंत्रीपद दिलं नाही का? यावर भास्कर जाधव यांनी थेट उत्तर दिलं आहे. वाटत नाही तसं पण असेल देखील कदाचित. कारण इतक्या दिवसांपासून राजकारणात असलेल्या माणसाला मंत्री केलं नाही. 2009 मध्ये मी रामदास कदम यांचा पराभव केला. तेव्हा पवारांनी सांगितलं होतं की विरोधीपक्ष नेत्याचा पराभव करणारा पहिला माणूस. अनेकदा मुख्यमंत्र्यांचा पराभव झालेले पण विरोधी पक्षाचा पराभव झाला नव्हता. त्यामुळे मला मंत्री मंडळात किंवा मंत्रीपद मिळायला पाहिजे होते. आपलं सरकार आलं होतं आणि त्या सरकारमध्ये मंत्री व्हावं अशी माझी इच्छा होती. पण मला घेतलं नाही हे माझं दुर्दैव.
राष्ट्रवादीमधून शिवसेनेत येण्याचा निर्णय चुकला का?
पवार साहेबांनी माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल असं मला वाटतं नाही. कारण ते खूप मोठ्या मनाचे आहेत. पण जर मी पवार साहेबांना सोडून आल्यामुळे जर मला पवार साहेबांना विरोध केला असेल तर त्यांनी ते बरोबर केलं. कारण ज्या पक्षात मला उमेदवारी नसता घेतलं. राज्याचा सरचिटणीस केलं, विधान परिषद मला दिली. निवडून आणलं, मला मंत्री मंडळामध्ये घेतलं, त्यांनी माझ्यासाठी सर्व काही केलं आहे. पवार साहेबांना सोडून येण ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.