
महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या तिच्या कार्यक्रमांमुळे नव्हे, तर तिच्या गाडीच्या अपघातामुळे चर्चेत आली आहे. पुणे येथे गौतमीच्या गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली, ज्यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. जख
.
शहाजी बापू पाटील म्हणाले, त्या गाडीत सेलिब्रिटी होती म्हणून इतका भपका करायची गरज नाही. ड्रायव्हरला अटक झाली गुन्हा दाखल झाला आहे. गाडी जप्त झाली आहे. कोर्टातून नुकसान भरपाई मिळेल. हा मुद्दा एवढा मोठा करायची काय गरज? त्या बिचाऱ्या गौतमी पाटीलला कशाला ताप देताय. तिच्या ड्रायव्हरने अपघात केलाय तो विषय संपला. गाडीत ती होती म्हणतात कोण नव्हती म्हणतंय. पण ड्रायव्हर कडून अपघात झाला तर मालकाला आत टाकून दोघांनी भांडणे करायची का?
पुढे शहाजी बापू पाटील म्हणाले की, ड्रायव्हर चुकला की कोण चुकले हे पोलिस पाहतील. गाडी मालकाने ड्रायव्हरच ठेवायचे बंद करावे. मालकांनी गाड्या चालवल्या पाहिजेत. आता गौतमीला सांगा तूच गाडी चालव. दहाच्या स्पिडने हळू हळू जा म्हणजे कार्यक्रमाला ती आज बुकिंग केले की ती चार दिवसांनी पोहोचेल. एवढा बारका मुद्दा एवढा मोठा करु नका. ती गरिब बिचारी रातभर झोपली नसेल, असे म्हणत शहाजी बापू पाटलांनी गौतमीला पाठिंबा दर्शवला आहे.
काय आहे प्रकरण?
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात 30 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर झाला. हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एका रिक्षेला गौतमीच्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे रिक्षा तीन वेळा पलटी झाली. अपघातानंतर गाडीतील लोक आजूबाजूला फार कोणी नसल्याचे पाहून तेथून निघून गेले, तर गंभीर जखमी रिक्षाचालक बराच वेळ रस्त्यावर पडून होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून, आता गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिस पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.