
बिहार निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर चित्र स्पष्ट होत चाललं आहे. महागठबंधनला मोठा फटका बिहार निकालात पाहायला मिळत आहे. असं असताना काँग्रेसने या चुकांमधून शिकावं, अन्यथा… ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला टोला लगावत आक्रमक भूमिका घेतली आहे.
बिहारच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली अन् चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंतच्या कलानुसार, जदूच्या एनडीए आघाडील बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपने यंदाच्या निवडणुकीत 243 पैकी 101 जागांवर उमेदवार उभे केले होते. महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि जनता दल युनायडेट यांनी प्रथमच मोठ्या संख्येने जागांवर निवडणूक लढवली आहे.
हा सगळा निकाल पाहता शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे. अंबादास दानवे आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की,काँग्रेसने मोठ्या चुका केल्या काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरवले असते तर परिस्थिती वेगळी असती ती चुकी बिहारमध्ये केली.
भाजपने सत्तेचा गैरवापर केला आहे. तेजस्वी यादव मुख्यमंत्री पद चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आर जे डी ने चुका केल्या एवढंच नव्हे तर मतदार यादी घोळ कायम आहेच. काँग्रेस जागावाटप मध्ये मोठा वाटा मागते ,विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं मत स्पष्ट आहे. यामुळं नुकसान होते. बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे
राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे मात्र जागावाटप अखेरच्या दिवशी पर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो..
महाराष्ट्र निवडणूक वेळी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री चेहरा घोषित केले असते जागावाटप आधी केले असते तर राज्यात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्र मध्ये झाली तीच बिहार मध्ये झाली, काँग्रेस ने आता ही वृत्ती बदलावी, असे म्हणत आंबादास दानवे आक्रमक झाले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



