
- Marathi News
- National
- Confusion In NDA After Seat Sharing; JDU BJP Are Taking Care Of The House…, Chief Minister Holds Meeting With Senior Leaders
पाटणा23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जागावाटपाच्या घोषणेनंतर एनडीए गोंधळात आहे. जेडीयू आणि भाजप आपापले घर सांभाळण्यात व्यग्र आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली, उमेदवारांच्या नावांपासून ते तिकीट नसलेल्या नेत्यांच्या पक्षातून बाहेर पडण्यापर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा केली. भाजपच्या बैठकांमध्ये उमेदवारीपेक्षा बंडखोरीची शक्यता दूर करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले.
आरएलएमओ आणि एचएएम त्यांच्या संबंधित जागावाटपावर नाराज होते. भाजप या दोन्ही पक्षांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवत आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करण्यासाठी होणारी एनडीएची संयुक्त पत्रकार परिषद पुढे ढकलली तेव्हा हे सर्व उघड झाले. आरएलएमओचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह व एचएएमचे प्रमुख जितनराम मांझी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.
गरीब म्हणून जागा कमी
‘हम’चे प्रमुख जितनराम मांझी म्हणाले, आम्ही गरीब आहोत, म्हणून कमी जागा मिळाल्या. आम्ही कमीमध्ये जगायला शिकलो, त्यातच समाधान आहे. मी एनडीएसोबत उभा आहे.
‘…बादलों ने फिर साजिश की’
उपेंद्र कुशवाहा यांनी आपली वेदना एका शेरद्वारे व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आज बादलों ने फिर साजिश की, जहां मेरा घर था वहीं बारिश की।’ कार्यकर्त्यांना म्हणाले, मनाप्रमाणे अनुकूल जागा मिळाल्या नाहीत. तुमच्या वेदना समजू शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.