digital products downloads

बीएड सीईटी परीक्षा: पहिल्याच दिवशी गोंधळ: सर्व्हर बिघाडामुळे परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलली, आता 28 किंवा 29 तारखेला होणार परीक्षा – Nagpur News

बीएड सीईटी परीक्षा: पहिल्याच दिवशी गोंधळ:  सर्व्हर बिघाडामुळे परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलली, आता 28 किंवा 29 तारखेला होणार परीक्षा – Nagpur News



बीएड सीईटी परीक्षा पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सर्व्हरमधील बिघाडामुळे ही परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता ही परीक्षा २८ किंवा २९ रोजी होणार आहे. परीक्षेची सुधारित तारीख आणि नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे कळवली जाईल, असे कक्षाने स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. नागपूर येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, डोंगरगाव येथे ३०० विद्यार्थी दुपारी ३ ते ४.३० या वेळेतील पेपर देण्यासाठी पोहोचले होते. विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्यास सांगितले होते, मात्र दुपारी ३.३० वाजेपर्यंतही पेपर सुरू झाला नव्हता. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी संगणक उपलब्ध नव्हते, तसेच नेटवर्कचीही समस्या होती. एमएच सीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट अॅसेस इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. त्यांनी इड्यूस्पार्क या कंपनीला परीक्षा केंद्रांवर सॉफ्टवेअर चालवणे आणि परीक्षा घेण्याचे उपकंत्राट दिले आहे. महाविद्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, परीक्षा घेण्यासाठी लागणारा सर्व्हर इड्यूस्पार्क स्वतः आणते. महाविद्यालयाचे काम केवळ संगणक आणि बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे असते. महाविद्यालयाने ३ ते ४ दिवस आधीच सर्व बैठक व्यवस्था आणि संगणक इड्यूस्पार्कच्या इंजिनिअर्सना दिले होते. त्यांनी परीक्षेपूर्वी सर्व संगणक व्यवस्थित सुरू असल्याची खात्री केली होती. मात्र, परीक्षेच्या अगदी अर्धा तास आधी इड्यूस्पार्कच्या इंजिनिअर्सना त्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले, असे महाविद्यालयाने सांगितले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp