
भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये महापशुधन एक्सपो आयोजित केला होता. या एक्सपोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच या प्रदर्शनाची भव्यता लक्षवेधी ठरली होती. आता या महापशुधन एक्सपोच्या आयोजनावरून करुणा शर्मा यांनी टीका केली आहे. महापशुधन म्हणजे प्रपोगंडा करण्याचा प्रकार होता. त्याच्या मंडपासाठी 3 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, पंकजा मुंडे यांच्यावर गाणे म्हणण्यासाठी आनंद शिंदे यांना बोलावण्यात आले होते. पंकजा मुंडे यांचे गाणे म्हणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पशूंसाठी आम्ही 50 कोटी देणार आहोत हे सांगण्यासाठी 5 कोटी रुपये जाहिरातीसाठी आणि गाण्यासाठी खर्च करण्यात आले, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, बीडमध्ये जागोजागी जनावरांना कचरा खाऊन जगावे लागत आहे, त्यांना चारा नाही, पाणी नाही. ते नालीतले पाणी पिऊन जगत आहेत. सत्ता आणि पॉवर असलेले लोक जनतेचा पैसा खर्च करत आहेत. त्याच्यामुळे पंकजा मुंडेंवर मी एक गाणे तयार केले आहे, असे म्हणत करुणा शर्मा यांनी पंकजा मुंडे यांना डिवचले आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई द्यावी. सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, तुम्ही हेक्टरी 2000 रुपयेच दिले, असे करुणा शर्मा म्हणाल्या. तसेच पंकजाताई बाग नासावते रे बीजेपीच्या कमळाचा, असे उपहासात्मक गाणे म्हणत करुणा शर्मा यांनी टीका केली आहे. पुढे त्या म्हणाल्या, मी बीडवासियांना शब्द देते की जसे माझ्या सासऱ्यांनी (स्वर्गीय गोपीनाथ मुंडे) जात पात न बघता गोरगरीब शेतकरी लोकांचे काम करून पुढाकार घेतला होता. परळीपासून सुरुवात करून बीड जिल्हा पूर्ण बीजेपीचा केला होता. तसेच काम मी करणार असून लोकांच्या हितासाठी लढणार असल्याचे शर्मा यांनी म्हटले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



