
मयूर निकम, झी मीडिया बुलढाणा : शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि गावातील सरकारी शाळांचे महत्त्व वाढवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने एक अभिनव पाऊल उचलले आहे. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणीपट्टी आणि घरपट्टी करात सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. चला, जाणून घेऊया या अनोख्या उपक्रमाबद्दल सविस्तर…”
“बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. येथील ग्रामपंचायतीने 24 मे 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत एक ठराव मंजूर केला, ज्यामुळे शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पाणीपट्टी आणि घरपट्टी करात सूट मिळणार आहे. ” गावातील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. गावकऱ्यांनी एकमताने या ठरावाला पाठिंबा दिला. यामुळे गावातील शिक्षणाचा स्तर उंचावेल आणि सरकारी शाळांबद्दलचा दृष्टिकोन बदलेल. बाजूलाच असलेल्या खाजगी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे मात्र आपल्या जिल्हा परिषदेत ही संख्या कमी असल्याने हा निर्णय घ्यावासा वाटला अशी प्रतिक्रिया महिला सरपंच अनुसया खडके तसेच ग्रामसेविका एस आर जाधव यांनी दिली
” हा निर्णय गावकऱ्यांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करेल आणि सरकारी शाळांबद्दल आकर्षण वाढवेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. पालकांना करात सवलत मिळाल्याने त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि शाळेत मुलांची संख्या वाढेल. अस ग्रामस्थ म्हणतात
“हा उपक्रम केवळ शिक्षणाला प्रोत्साहन देणार नाही, तर गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना देखील दिलासा देईल. विशेषतः, खासगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेत सरकारी शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा एक पथदर्शी प्रयत्न आहे. आपल्या मराठी अर्थातच मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत त्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा ठराव स्वागतार्ह आहे.
“भडगाव मायंबा ग्रामपंचायतीचा हा अनोखा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे गावातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासोबतच सरकारी शाळांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. इतर गावांनीही असा पुढाकार घेतला, तर ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता नक्कीच सुधारेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.