
Dhananjay Munde On Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. याप्रकरणी जालना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला सांगतो शांततेने घ्या. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. यातून आता सगळे जागे होणार. मनोज जरांगे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दरम्यान धनंजय मुंडेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय.
काय म्हणाले मुंडे?
बीडची सभा वगळता मी कधीच जरांगेविरोधात बोललो नाही. एकदा माझ्या हातून त्यांनी उपोषणदेखील सोडलंय. आम्ही 18 पगड जातीला एकत्र घेऊन जातोय. जरांगेंना वाटत धनंजय मुंडे या पृथ्वीतलावरच नसावा.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाऊन खरच फायदा आहे का. पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कोणी तयार केलं. आपल्याला एकत्र येऊन गावागावात निर्माण झालेला सामाजिक तडा सोडवावा लागेल. घर जाळणारी पिल्लावळ जन्माला आलीयत ती कोणाची आहेत. तलवारीनं मला मारायाला आलेले मी त्यांची गळाभेट करुन त्यांना चहा पाजली. जरांगेंनी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. ईडब्ल्यूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, धनंजय मुंडे म्हणाले.
माझ्यासोबत जरांगें आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग करा. मी वकील लावेन आणि परवानगी घेईन. उठायचं आणि मुख्यमंत्र्यांची आयमाय काढायची. पंकजा ताईंनाही बोलायचं. आई बहीणीवरुन बोलल्यावर राग येतो पण आम्ही तो गिळलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता, असेही ते म्हणाले.
अशापद्धतीने तुम्ही हाकेंना मारलं. वाघमारेंना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे? गेस्ट हाऊसला मी मिटींग घेत असतो. तिथे अनेकजण येत असतात. तिथे कोणी भेटत असेल. बोलणारे, भेटणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप माझ्यावर. माझी इमेज अशी तयार करतायत. यामागचं कारण माझ्या 2 प्रश्नांना उत्तर देण्याची त्यांची हिम्मत नाही, असे मुंडे म्हणाले.
माझं जीवन मरण गरीबांसाठी आहे. मी काय करावं म्हणून की काही करु नये म्हणून हे करता. त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची. आम्ही आपल्या कामात असतो. फोनवर काही बोललेलो नाही. ब्रेन मॅपिंग, नार्को आणि सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
बीडचा कांचन नावाचा कार्यकर्ता धनंजय मुंडे यांचा पीए आहे. त्याने या आरोपींना सोबत घेऊन परळी येथील रेस्ट हाऊसला नेलं .तिथे पकडलेल्या एका पैकी माझ्याकडे भरपूर आहे असं सांगत दोन कोटी त्यांना द्यायचे ठरले. संभाजीनगरच्या झालटा फाटा येथे धनंजय मुंडे या आरोपींची एक तास वाट पाहत राहिले. आरोपींना गोळ्या पुरवण्याचं आश्वासन दिलं. यात खूप जण आहे अंतरवालीच्या परिसरातील बडे नावाची व्यक्ती देखील आहे यात एकूण 10 ते 11 जण आहेत. ठिकाणी मग मुंडे यांनी आपल्याला मारण्यासाठी गोळ्या देण्यास सांगितल्याचा दावा जरांगे यांनी केला. तर आपल्या वाहनाला दुसऱ्या वाहनाची धडक देण्याची योजना पण असल्याचा दावा जरांगेंनी केला.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगें पाटलांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं समोर आलंय.याप्रकरणी राजकीय वर्तुलळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.. हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत याबाबत चौकशी करून कारवाई व्हावी असं मत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलंय. तर मनोज जरांगे हे समाजासाठी लढणारे नेते म्हणून उदयास आले आहेत.. मतभेद असून शकतात..मात्र विचारांची लढाई विचारांनी लढावी, असं वडेट्टीवार म्हणालेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



