digital products downloads

‘ब्लॅक बॉक्समध्ये अखेरच्या क्षणापर्यंत…’, अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरे स्पष्टच बोलले, ‘जे सत्य आहे…’

‘ब्लॅक बॉक्समध्ये अखेरच्या क्षणापर्यंत…’, अजित पवारांच्या अकाली निधनानंतर सुनील तटकरे स्पष्टच बोलले, ‘जे सत्य आहे…’

Sunil Tatkare demands high level investigation of Ajit Pawar plane crash: अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलीय. झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट विथ कमलेश सुतार’ या कार्यक्रमात तटकरेंनी ही भूमिका मांडली. अपघाताची चौकशी होऊन राज्य आणि देशातील जनतेसमोर सत्य यावं असं तटकरेंनी म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आधी कुणी सुरु केली असा सवालही त्यांनी विचारला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

‘जिवलग सहकारी म्हणून माझीही ठामपणे हीच मागणी’

“ज्या दिवशी दुर्दैवी अपघात घडला तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने यासंदर्भात खोलवर चौकशी करावी. पहिले दोन दिवस मी प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचीही हीच भूमिका आहे की, केंद्रीय मंत्रालय, राज्य सरकारने ज्या काही अशा दुर्देवी घटना घडत असतात त्यासाठी काम करणाऱ्या तपास यंत्रणांमार्फेत चौकशी लवकरात लवकर करावी. फक्त महाराष्ट्र नाही तर देशाच्या जनतेसमोर वास्तव आणावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आणि जिवलग सहकारी म्हणून माझीही ठामपणे हीच मागणी आहे,” असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. 

‘सत्यता देश, राज्यातील लोकांसमोर यावी’

तुमचं काय व्यक्तिगत मत आहे असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “एखाद्या बाबतीत काही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर व्यक्तिगत मत राहणं हा विषय नाही. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सत्यता देश, राज्यातील लोकांसमोर यावी हाच ठाम आग्रम आहे”. 

‘प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत’

“एखाद्या कोणत्याही घटनेबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण झाल्यानंतर देशातील व्यवस्थेनुसार त्यावर सखोल चर्चा आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणांमार्फत चौकशी करणं गरजेचं आहे. विमान अपघातात ब्लॅक बॉक्स महत्वाचा असतो, ज्यात अखेरच्या क्षणापर्यंतच्या नोंदी असतात. पायलट काय बोलले, काय घडलं आणि इतर बाबीही समोर येतील. ते बाहेर येईल आणि ते येणं गरजेचं आहे. दादांच्या अकाली जाण्याने राज्यात शोककळा पसरली असताना त्यातून जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याची उत्तरं मिळाली पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे,” असं ते म्हणाले. 

‘पहिल्या दिवसापासून विलिनीकरणाची चर्चा कोणी केली’

नरहरी झिरवळ यांनी विलिनीकरणासंदर्भात केलेल्या विधानाचा दाखला दिला असता सुनील तटकरे म्हणाले की, “नरहरी झिरवळ आमच्या पक्षाचे मंत्री आहेत. अजित पवारांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पहिल्या दिवशी ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले. नरहरी झिरवळ अंत्यसंस्कारानंतर बोलले. मी पुन्हा एकदा गांभीर्याने एका शोकाकुल मनस्थितीतच हे चार दिवस विचारत आहे की, यासंदर्भातील स्पष्टता येऊद्यात. अजितदादांचं अकाली जाणं आमच्या सर्वांना मानसिक धक्का देणारं आहे. त्यामुळे याच्यातून काही राजकीय प्रश्न निर्माण करणं, राजकारण करणं माझ्या स्वभावात नाही. मी दादांचा एका कार्यकर्ता होतो आणि उद्याही राहीन. योग्य वेळेला त्याची उत्तरं येतील”. 

“माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून 4 दिवस मिळालं नसताना मी पुढच्या प्रश्नांची उत्तरं कशाला देऊ. विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरु केली हे सर्वांना माहिती आहे. पहिल्या दिवसापासून चर्चा कोणी केली हे माध्यमांनी दाखवलं आहे. मी कशाला कोणाचं नाव सांगू. मला काय सांगण्याची आवश्यकता आहे? महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. त्यांनी यासंदर्भात बोलावं,” असंही त्यांनी म्हटलं आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp