
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) पर्वतीय भागांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यानं पुन्हा हवामानात बदल झाले आहेत. तर, मध्य भारतात मात्र तापमानाचा पारा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राजस्थानमध्ये मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण होत आहे.
परिणामस्वरुप राजस्थानमधील उष्ण वारे गुजरातवरून महाराष्ट्राच्या दिशेनं येत असल्यामुळं राज्यातही सूर्याचा कोप पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांसोबतच पुढचे पाच दिवस पुन्हा एकदा राज्याच्या तापमानात किमान दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्याच्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागाला उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकण आणि मुंबईच्या काही भागांमध्ये मधूनच जाणवणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं तापमानात वाढ नसली तरीही उष्मा जाणवण्याचं सत्र मात्र कायमच टिकून असल्याचं पाहायला मिळत आहे.
सलग लागून आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्तानं अनेकांचेच पाय गिरीस्थानं आणि पर्यटनस्थळांच्या दिशेनं वळले आहेत. मात्र तापमानाचा आढावा घ्यायचा झाल्यास शनिवारी पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा जारी करण्यात आला आहे. त्यामुळं सहलीची रंगत या उकाड्यामुळं कमी होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही.
18 April, उन्हाळी, Tmax Maharashtra 40+Deg C
Chikalthana 41.8
Nandurbar 41.7
Nashik 40
Solapur 43.2
Parbhani 42.3
Satara 40.2
Jeur 43
Dharashiv 41.6
Udgir 40.8
Beed 43.4
Sangli 39.2 pic.twitter.com/g6gEkl0PHS— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 18, 2025
मराठवाड्यात उष्णतेचा मारा असह्य होत असलानात विदर्भातही चित्र वेगळं नाहीय. सध्या इथं अवकाळीचं सावट नसून, सूर्याचाच मारा आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथं करण्यात आली, जिथं पारा 44 अंशांपर्यंत पोहोचला आहे. तर, राज्याचं सरासरी तापमान 40 अशांच्या घरात असल्याचं स्पष्ट होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.