
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी आपल्यावरील अघोरी विद्येचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. आम्ही अघोरी, बिघोरी काहीही जाणत नाही. पण भेटायला येणाऱ्या साधू महात्म्यांना जरूर भेटतो. अघोरी विद्या माहि
.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी वसंत मोरे यांनी सर्वप्रथम भरत गोगावले यांच्यावर अघोरी विद्येचे आरोप केले होते. त्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनीही या आरोपांचा पुनरुच्चार केला होता. या प्रकरणी राज्यात उलटसुलट चर्चा सुरू असताना भरत गोगावले यांनी शुक्रवारी प्रथमच आपल्यावरील आरोप धुडकावून लावले आहेत. आम्हाला अघोरी विद्या काय असते हे काहीही कळत नाही. ही विद्या माहिती असती तर मी आत्तापर्यंत केव्हाच पालकमंत्री झालो असतो, असे ते म्हणाले. गोगावले कर्जत येथे आयोजित शिंदे गटाच्या कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
आम्ही रडणारे नव्हे तर लढणारे
भरत गोगावले पुढे म्हणाले, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही रडणारे नव्हे तर लढणारे आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालो. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यासोबत काम करतो. त्यामुळे आम्हाला अघोरी विद्या, अघोरी पूजा असे काहीही कळत नाही. आम्हाला ते माहितीही नाही. शेवटी जे नशिबात आहे तेच होते.
अघोरी पूजा करून काही मिळवायचे असते तर आम्ही यापूर्वीच पालकमंत्रीपद मिळवले असते. आम्ही अघोरी, बिघोरी काहीही जाणत नाही. पण जे साधू-महात्मे आम्हाला भेटायला येतात, त्यांना जरूर भेटतो. भरत गोगावले यांनी यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुद्दे नसल्यामुळे ते असे व्हिडिओ पोस्ट करत असल्याचाही आरोपही केला.
सूरज चव्हाण यांनी पोस्ट केले होते व्हिडिओ
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांचे कथित अघोरी पूजेचे दोन व्हिडिओ शेअर केले होते. त्यात मंत्री गोगावले हे कोणती तरी पूजा करताना दिसून येत होते. ही पूजा कशाची व का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण चव्हाण यांनी ही अघोरी पूजा मंत्रिपदासाठी करण्यात आल्याचा दावा केला होता. त्यावरून बरेच राज्यात आकांडतांडव माजले होते. संभाजी ब्रिगेडनेही या वादात उडी घेतली होती.
संजय राऊत यांनीही साधला होता निशाणा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती. हे कृत्य महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरोधात कायम लढा दिला. त्याची मोठी परंपरा राज्याला लाभली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस जसे मंत्र्यांचे पीए तपासून घेतात, तसे त्यांनी मंत्रीही तपासून घेतले पाहिजेत. अघोरी विद्येमध्ये रममाण असणारे मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार? असा सवाल त्यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला होता.
हे ही वाचा…
हिंदीची सक्ती नको, पण तिचा द्वेषही नको:कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही – शरद पवार
पुणे – हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यासंबंधीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदी भाषेची सक्ती असू नये. पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. या प्रकरणी कुणी स्वतःहून हिंदी शिकत असेल, तर त्याला नाही म्हणण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.