
सुरक्षारक्षक म्हणून केलेल्या कामाच्याओळखीचा गैरफायदा घेत मोहाडीरस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतीलअपार्टमेंटमध्ये शिरून महिलेला चाकूचाधाक दाखवत लुटण्याचा धाडसी प्रयत्नसोमवारी दुपारी करण्यात आला. यावेळीहिम्मत दाखवत त्या महिलेने स्वत:चाबचाव केला; मात्
.
गोकुळ हंसराज राठोड असे याहल्लेखोराचे नाव असून तो चाळीसगावतालुक्यातील सांगवी येथील रहिवासीआहे. दीड वर्षांपूर्वी त्याने मोहाडीरस्त्यावरील बालाजी हाइटस् याअपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामकेले होते. त्यामुळे तिथल्या रहिवाशांशीत्याची ओळख होती. त्याचाच गैरफायदाघेत तो सोमवारी दुपारी दोन वाजेच्यासुमारास पहिल्या मजल्यावर राहणाऱ्याआरोही इंद्रकुमार ललवाणी (वय ३८)यांच्या घरी गेला. उर्वरीत. पान ४
अनेक अपार्टमेंटच्या बाहेर सुरक्षारक्षक नियुक्त असतात. पण ते बाहेरुन येणाऱ्या लोकांनाकेवळ कोणाकडे जायचे एवढेच विचारतात. काही ठिकाणी नावही लिहून घेतले जाते.पण तेवढ्याने अशा घटना टाळता येणार नाहीत. त्यासाठी बाहेरून येणारी व्यक्ती ज्याव्यक्तीकडे जायचे सांगते त्या व्यक्तीस फोनवरून विचारल्याशिवाय अगंतुकांना इमारतीतप्रवेश मिळणार नाही, अशी व्यवस्था केली तरच पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत.
सोडले की पळून गेला?
अनधिकृतपणे घरात प्रवेश, जीवे ठारमारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी अशागंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गोकुळराठोडला पोलिसांनी तातडीने अटककरायला हवी होती. पण त्याला ताकीददेऊन सोडून दिल्याचे सायंकाळी ठाणेअंमलदाराने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारासपोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबनआव्हाड यांना त्या संदर्भात विचारलेतेव्हा, ‘याची आपल्याला माहिती नाही.माहिती घेऊन सांगतो’ असे उत्तर त्यांनीदिले. त्यानंतर त्यांनी वारंवार फोनकरूनही प्रतिसाद दिला नाही. आरोपीगोकुळ राठोडला मेमो देऊन सोडून दिले,असे ठाणे अंमलदार सांगत असले तरीत्याला ‘मेमो’ हा वैद्यकीय तपासणीसाठीदिला गेला होता आणि तिथे गेल्यानंतर तोआरोपी पसार झाला, अशी माहितीसुत्रांकडून देण्यात आली आहे. आरोपीपसार झाला ही बातमी झाली तर संबंधितकर्मचाऱ्यांवर कारवाई होईल, या भीतीनेती माहिती दडवण्यात येत असल्याचासंशय त्यामुळे बळावला आहे.
गुन्ह्याचे कलम अजामिनपात्र
पोलिसांनी आरोपी गोकुळ राठोडवर भारतीयन्याय संहितेच्या कलम ११८(१) नुसार गुन्हानोंदवला. धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनीस्वेच्छेने दुखापत करणे असा त्याचा अर्थ आहे.या कलमाखाली गुन्हा सिद्ध झाल्यास तीनवर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा वीस हजार रुपयांपर्यंतदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे हेकलम अजामिनपात्र आहे. तरीही मेमो देऊनसोडून दिले, असे पोलिस ठाण्यातून सांगितलेजाणे म्हणूनच संशयास्पद आहे. दरम्यान,पोलिसांनी ११८(३) हे कलम लावणे आवश्यकहोते, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्या कलमान्वयेआजीवन कारावास किंवा दहा वर्षांपर्यंततुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा होऊशकते, असे अॅड. केतन ढाके यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.