
Maharashhtra ZP Election Results : महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषद, नगरपालिका त्यानंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनंच विजयाचा झेंडा फडकवला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. तर भाजपपाठोपाठ शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. जिल्हा परिषदेतही भाजपनं विजयाची घौडदौड कायम ठेवत आपणच बाहुबली असल्याचं दाखवून दिले आहे. मात्र, या निकालात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या निकालाची आकडेवारी पाहून शॉक व्हाल.
12 जिल्हा परिषदांपैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा
12 जिल्हा परिषदांपैकी भाजपनं 8 जिल्हा परिषदांवर झेंडा फडकवलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेनं 3 तर दादांच्या राष्ट्रवादीनं एका जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केलीय. तर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. तर 125 पंचायत समितींपैकी भाजपनं 51 ठिकाणी विजय मिळवला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं 32, राष्ट्रवादीनं 28, काँग्रेस 7, ठाकरेंच्या शिवसेनेनं 5, पवारांच्या राष्ट्रवादीनं 2 पंचायत समितीवर विजय मिळवला आहे. नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपनं प्रचाराचा धडाका लावला होता, मात्र अजित पवारांच्या निधनानंतर भाजप, दादांच्या राष्ट्रवादीनं प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र, तरीही भाजपसह, शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद निवडणुकीत बाजी मारली आहे. दरम्यान यानंतर भाजपनं महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.
ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मोठा पराभव
मविआची मात्र पुन्हा एकदा धुळदाण उडाली आहे. नगरपरिषद, महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही मविआला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. एकाही जिल्हा परिषदेत मविआला सत्ता स्थापन करता आलेली नाही, यावरून सत्ताधा-यांनी विरोधकांना डिवचल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपच एक नंबरचा पक्ष ठरलाय. नगरपरिषद, महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजपचा डंका पाहायला मिळाला, मात्र, मविआच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलीय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तर मविआचा सुपडासाफ झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



