
पुण्यातील जैन बोर्डिग हाऊसच्या कथित जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाने आपल्या प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या नेत्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी या प्रकरणी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांची बाजू घेत या प्र
.
सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या लढ्याला सोमवारी पहिले यश मिळाले. मुंबई येथील धर्मादाय आयुक्तालयाने या प्रकरणी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे या प्रकरणी वादात सापडलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जबर झटका बसला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या लढ्याला एक पुणेकर म्हणून पाठिंबा दर्शवला आहे.
भाजपच्या लोकांनी स्वतःची पातळी घालवली
वसंत मोरे या प्रकरणी बोलताना म्हणाले, मी एक पुणेकर म्हणून रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी आहे. ते सत्तेत असूनही एखादा विषय लावून धरत आहेत. यासंबंधी त्यांचे कौतुक करायलाच हवे. त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. त्यांचा उल्लेख भटकी कुत्री असा केला जात आहे. हा संतापजनक प्रकार आहे. भाजपच्या नेत्यांनी स्वतःची पातळी घालवली आहे. अशी टीका करून ते स्वतःची पातळी काय आहे हे दाखवून देत आहेत. रवींद्र धंगेकर एखादी खरी बाजू मांडत असतील, तर तुम्ही ती स्वीकारायला हवी. भटकी कुत्री व अन्य कुठलीही खालच्या पातळीवरील टीका भाजपचे लोक करत असतील तर ते स्वतःची पात्रताच दाखवत आहेत.
खऱ्याचे समर्थन केले पाहिजे
वसंत मोरे पुढे म्हणाले, एखादा व्यक्ती खरे बोलत असेल तर ते तुम्ही ऐकले पाहिजे. रवींद्र धंगेकर खोटे बोलत असते तर धर्मादाय आयुक्तांनी त्या व्यवहाराला स्थगिती दिली नसतसी. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. धंगेकर खरे बोलत असावेत. मी स्वतः त्यांना ओळखतो. ते अभ्यासपूर्ण काम करतात. मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. एखादा विषय हाती घेतला तर ते लावून धरतात. पुण्यातील एखादी व्यक्ती, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी या शहराचा नागरीक म्हणून शहरात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असेल, शहरातील जमिनी कुणी बळकावू नये यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण त्या व्यक्तीचे समर्थन केले पाहिजे.
जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील तर त्यात काही चुकीचे नाही
प्रस्तुत व्यवहारातील जमीन जैन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या जागेवर कुणीतरी गोखले नामक बांधकाम व्यावसायिक येतो. तिथे मॉल बांधण्याचा प्रयत्न करतो. तेथील जैन समुदायाला हटवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याविरोधात जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील, तर त्यात काहीही चुकीचे नाही. एक पुणेकर म्हणून मी धंगेकर यांच्या पाठिशी आहे, असेही वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.