
केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त भाजपतर्फे अनेकविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१४ ते २०२५ या ११ वर्षात देशाचा कायापालट झाला आहे. या निमित्त भाजपतर्फे आयोजित विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचा समारोप २५ जून रोजी आणीबाणी दिनी होणार असल
.
नागपूर शहरांत सहा विधानसभा क्षेत्रातील २० मंडळात प्रत्येकी १० सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांमधून ११ वर्षातील निर्णयांची माहिती दिली जाईल. या शिवाय व्यापारी, शिक्षक, वकील, सी. ए. अशा विविध समाज घटकांशीही संवाद साधण्यात येईल असे तिवारी यांनी सांगितले. विशेषत: ३५ वर्षांपेक्षा कमी वयातील तरूण तसेच नवउद्यमींशी संवाद साधून सरकार विषयीच्या त्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यात येणार आहे. डिजिटल मीडियासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
याच शृंखलेत २१ जून रोजी सुरेश भट सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत डॉ. उदय निर्गुडकर हे घेणार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या समाजकल्याणकारी निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, घर चलो अभियानांतर्गत पत्रकांद्वारे ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली जाईल. १२ शहरातील विविध उद्याने, चौक आणि मॉलमध्ये चौपाल आयोजित करून ११ वर्षांच्या कार्यकाळावर संवाद साधण्यात येईल असे तिवारी यांनी सांगितले. यावेळी गिरीश व्यास, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनिल सोले, माजी खासदार अजय संचेती आदी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.