
वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर एआयच्या मदतीने पीडित लोकांचे ‘घिबली’ शैलीत रूपांतरित करून त्याचा वापर द्वेषपूर्ण प्रचारासाठी भाजपकडून केल्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी भ
.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी एका पोस्टच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, अशा संकटाच्या काळात एखाद्याच्या मनात असा विचार कसा येतो की, हल्ल्यातील प्रतिमा वापरून द्वेष पसरावा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षाची सध्याची प्राथमिकता बचावकार्य, प्रभावित क्षेत्रांची मदत आणि सीमा सुरक्षा असावी, द्वेष पसरवणे नव्हे. त्यांनी असेही सूचित केले की, संकटाच्या काळात समाजात एकता आणि सहकार्याची भावना वाढवणे आवश्यक आहे, द्वेष प्रचार नव्हे. या माध्यमातून सुजात यांनी भाजपवर टीका केली.
वास्तविक भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या एका पोस्टला सुजात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनांनी द्वेष प्रचाराच्या विरोधात एकत्र येण्याची गरज यात त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन
पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू-कश्मीर मध्ये अडकलेले आहेत. यातील अकोला इतर ठिकाणच्या 30 पर्यटकांच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच या पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यानुसार उद्या या पर्यटकांना सुरक्षित परत आणले जाणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.