
Raut Slams BJP: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना, “तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे,” असं विधान केलं. या विधानावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपाबरोबरच बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.
पैशाचा आणि सत्तेचा मदमस्त वापर करून…
“चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शहा असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही. भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. बावनकुळे या मंडळींनी पैशाचा आणि सत्तेचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूद आणली आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजनल पक्ष नाही,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.
दुसऱ्यांचे पक्ष चोरी का करता?
“इतरांचे पक्ष फोडणे आणि आपल्यासोबत भ्रष्टाचारांना देखील घेतले आणि आपला पक्ष वाढवला मात्र उद्या यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूद उतरलेली असणार आहे. तुमचा पक्ष विचार धारेवर वाढवा दुसऱ्यांचे पक्ष चोरी का करतात?” असा सवाल राऊतांनी विचारला आहे. “भारतीय जनता पक्ष आजचा तारखेत 70% उपदवापींचा पक्ष आहे त्यांचा भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नाही,” असा टोला राऊतांनी लगावला.
शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडणार
“एवढं करून सुद्धा त्यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा! यांचे जे नेते आहेत अमित शाह, त्यांची देखील विचारधारा तीच आहे. दुसऱ्यांचा पक्ष फोडा आणि आपलं वाढवा,” असं राऊत अमित शाहांवर निशाणा साधताना म्हणाले. “बावनकुळे यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत. शिवसेना फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस सोडा आता ते शिंदे यांची शिवसेना देखील फोडणार आहेत व ते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडणार आहेत,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला.
शरद पवार अजित पवारांना माफ करणार नाहीत
“अजित पवार हा शरद पवार यांचा विषय आहे. पवार साहेब आणि ते भेटतात त्यांचे काही संस्थात्मक कार्यक्रम असतात. पण राजकीयदृष्ट्या म्हटल्यात तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत. आमचं देखील कुटुंब आहे ठाकरेंचं पण आमच्या स्वभावात त्यांच्या स्वभावात फरक आहे. अमित शहांनी अजित पवारांना हाताशी धरून पक्ष फोडला त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहेत पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत,” असं राऊत म्हणाले. “अजित पवार भाजपबरोबर राहून कदापी मुख्यमंत्री होणार नाहीत त्यांना भाजपमध्ये विलीन व्हायला लागेल,” असं राऊत म्हणाले.
पवारांना पुस्तक प्रकाशनासाठी भेटलो
मी शरद पवार साहेबांना भेटलो नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशन करिता आणि ते 17 मे रोजी आहे. त्यांना पुस्तकाची प्रत हवी होती त्यांना ती दिली आणि अनेक विषयांवर चर्चा केली, अशी माहिती राऊतांनी दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.