
चांदूर रेल्वे येथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन तीन दिवस उलटले असले तरी, भाजप आणि काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. याउलट, आम आदमी पा
.
स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही प्रमुख पक्ष नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या चाचपणीच्या टप्प्यावर आहेत.
नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने काँग्रेसमध्ये कौटुंबिक राजकीय वारसा असलेल्या तीन महिलांची नावे चर्चेत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि इतर राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसला एकमुखी निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, भाजपतर्फे एका डॉक्टर महिलेसह दोन उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. पक्षाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला, परंतु त्या सभेतही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही, यामुळे संभ्रम वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर, ‘आप’ने जलद रणनीतीचा वापर करत नम्रता गवळी यांच्या नावाची नगराध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेमुळे ‘आप’ सध्या चांदूर रेल्वेत एकमेव राष्ट्रीय पक्ष ठरला आहे, ज्याने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
नम्रता गवळी यांच्या नावाच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापले असून, आता इतर पक्षांवरही आपले उमेदवार तातडीने घोषित करण्याचा दबाव वाढला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



