
दुचाकीचे मीटर फोडल्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी झालेला वाद सोमवारी पुन्हा चिघळून त्याचे पर्यवसान एकाच्या खुनात झाले. वाद मिटवण्यासाठी दोन डिव्हिजनमधील विद्यार्थ्यांत झालेल्या बैठकीत बाचाबाचीनंतर बाहेरून बोलावलेल्या गुंडाने सुऱ्याने चौघांना भोसकले. ही घटना सोमवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात घडली. यात विक्रम नारायण पांचाळ (२१) हा तरुण जागीच ठार झाला तर अन्य चौघे गंभीर जखमी आहेत. विशेष म्हणजे यातील मृत आणि मुख्य आरोपी वगळता सर्वच तरुण १८ वर्षांच्या आतील आहेत. पुरणमल लाहोटी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोरील बाजूलाच शासकीय वसतिगृह आहे. श्रीधर पाटीलसह दोघे ताब्यात श्रीधर हा २२ वर्षांचा असून यापूर्वीही खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तो कारागृहात होता. श्रीधरला खास आशिव येथून बोलावले होते. त्याने सुरा सोबत आणला आणि भांडण मिटवण्याऐवजी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. घटनेच्या दोन तासांतच पोलिसांनी श्रीधर आणि अन्य एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी विक्रमला मित्रांनी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा जागीच मृत्यू झाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



