
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवली असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. भारतीय सैन्याने पाकमध्ये शिरून दहशतवाद्यांचे नेस्तनाबुत केले. त्यांची वेगवेगळी लष्करी तळे उद्ध्व
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या शासकीय निवासस्थानी नागरी सुरक्षेच्या मुद्यावर लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह सर्वच उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रस्तुत बैठकीत मुंबईसह महाराष्ट्राच्या सुरक्षेचा आढावा घेतल्याचे स्पष्ट केले.
आम्ही लष्कीर अधिकाऱ्यांपुढे आमच्या चिंता मांडल्या
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याच्या नागरी सुरक्षेच्या संदर्भात आज एक बैठक झाली. युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारने यापूर्वी आपल्या विविध विभागांची बैठक घेतली होती. पण तेव्हा सेनादलाचे अधिकारी देश सुरक्षित ठेवण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती. पण त्यांच्याशी आपला चांगला समन्वय होता. आत्ता आजची जी बैठक झाली, त्यात गत काही दिवसांत आपल्याला जो अनुभव आला त्यात अधिकचे काय करण्याची गरज आहे? भविष्यात आपला रोडमॅप कसा असावा? आपण कसे अलर्ट राहिले पाहिजे? त्यावर चर्चा झाली. आम्ही लष्कराकडून त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. आम्ही आमच्याही चिंता मांडल्या.
मुंबई फार संवेदनशील शहर
ते पुढे म्हणाले, आपल्या सैन्याने पाकला त्याची जागा दाखवली. पाकमध्ये शिरून अतिरेक्यांचे अड्डे नेस्तनाबुत केले. एवढेच नाही तर त्यांचे वेगवेगळे सैनिकी तळेही नेस्तनाबुत केले. त्यामुळे पाकला आपण भारताविरोधात युद्ध लढू शकत नाही हे माहिती आहे. अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात व वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात.
म्हणूनच मुंबई ही देशाची राजधानी असल्यामु्ळे ती फार संवेदनशील आहे. त्या दृष्टिकोनातून काय खबरदारी घेतली पाहिजे व कसा समन्वय साधला पाहिजे, यावर आजच्या बैठकीच चर्चा झाली. अतिशय चांगला समन्वय आम्ही साधला. कुठे आपल्याला जास्त लक्ष देण्याची गरज आहे ते आम्ही समजून घेतले. त्यानुसार आम्ही पुढल्या काळात काम करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा…
रोहित पवारांची शस्त्रसंधीच्या निर्णयावर शंका:इंदिरांनी पाकचे 2 तुकडे पाडल्याची आठवण काढत सांगितला बांगलादेशाच्या निर्मितीचा किस्सा
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारत-पाकमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे पाडल्याची आठवण करून देत बांगलादेशाच्या निर्मितीचा विस्तृत किस्सा सांगितला आहे. इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतरच युद्धविराम घोषित केला. कारण, त्या इंदिरा गांधी अर्थात आर्यन लेडी होत्या, असे ते अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणताना म्हणालेत. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.