
Shubhanshu Shukla: अंतराळ विश्वात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात मे 2025 मध्ये स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनणार आहेत. त्यामुळे सर्व भारतीयांचे या मोहिमेकडे लक्ष लागले आहे.
शुभांशू यांना 2000 पेक्षा जास्त उड्डाण तासांचा अनुभव आहे.हे अभियान भारतीय अंतराळ संशोधनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. जागतिक अवकाशात भारताच्या वाढत्या सहभागाचे प्रतीक असेल. शुभांशू शुक्ला अॅक्सिओम स्पेसच्या एक्स-4 मोहिमेचा भाग असतील. ज्यामध्ये ते चार खासगी अंतराळवीर असून शुभांशू त्यापैकी एक आहेत. नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन या मोहिमेचे नेतृत्व करतील.
Launch Update
Axiom Mission 4 (Ax-4), the fourth private astronaut mission to the @Space_Station, is targeted to launch no earlier than May 2025 from @NASAKennedy in Florida.
Learn more about private astronaut missions: https://t.co/YxrgiAActD pic.twitter.com/Zuapfgorwd
— NASA Space Operations (@NASASpaceOps) April 2, 2025
भारतीय संस्कृती पोहोचवणार अंतराळात
अवकाशात भारताची उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी शुभांशू शुक्लांचे हे अभियान खूप महत्वाचे आहे. भारतीय संस्कृतीला विज्ञानासोबतच अंतराळात घेऊन जाणारे हे अभियान भारतीय अंतराळ प्रवासासाठी एक नवीन दिशा आणि संधी निर्माण करेल, असा विश्वास तमाम भारतीयांकडून व्यक्त करण्यात येतोय. शुक्ला हे अंतराळात जाऊन भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करतील. म्हणजेच भारतीय कलाकृती आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात योगासनांचा सराव ते करतील. याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय विज्ञान आणि संस्कृतीचे मिश्रण जगाला पाहायला मिळेल. त्यामुळे इतर कोणत्याही उपक्रमापेक्षा ही अंतराळ मोहिम पूर्णपणे वेगळी ठरणार आहे.
भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वाचा टप्पा
शुक्लांची ही अंतराळ मोहीम भारतीय अंतराळ मोहिमांसाठी एक ऐतिहासिक क्षण असेल. यासोबतच भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. भारतीय अंतराळवीरांना स्वदेशी अंतराळयानातून अंतराळ प्रवासावर पाठवणे हे गगनयान मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेसाठी शुक्ला यांना नामांकन देण्यात आलंय. दरम्यान X-4 मोहिमेत ते NASA, Axiom Space आणि ISRO यांच्या सहकार्याने पृथ्वीच्या कमी कक्षेत वैज्ञानिक प्रयोग, शैक्षणिक कार्य आणि व्यावसायिक अॅक्टिव्हीटींवर लक्ष केंद्रित करतील.
भारतीय अंतराळ संशोधनात प्रगती
हा प्रवास शुभांशू शुक्ला यांच्यासाठी वैयक्तिक कामगिरी म्हणून महत्वाचा असेलच पण त्याचवेळी 1.4 अब्ज भारतीयांच्या सामूहिक आकांक्षांचे प्रतिनिधित्व ते करतील. भारताच्या अंतराळ प्रवास क्षमता वाढतेय. विज्ञान आणि तंत्रज्ञानात क्षेत्रात देश प्रगती करतोय. त्याचसोबत आता जागतिक अंतराळ समुदायातही भारताची भूमिका या मोहिमेमुळे अधोरेखित होणार आहे. शुक्ला यांच्या प्रयत्नांमुळे भारतीय अंतराळ संशोधनात प्रगती करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.