
India Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने 7 मे 2025 पासून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ले सुरु केले आहेत. यामुळे भारत पाक यांच्यात युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशात हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांसह प्रमुख मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे.
साई बाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनासाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. साई मंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यास मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी साईबाबा संस्थांनसह बैठक घेतली.
बैठकीनंतर मंदिर परिसरात पाहणी देखील केली.
आगामी धोका लक्षात घेता साईबाबा संस्थानने हा निर्णय घेतल्याचे समजते. पुढील आदेशापर्यंत साईमंदिरात फुलहार व प्रसाद नेण्यास मनाई असेल. साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही माहिती दिली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. मंदिर परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि कमांडो पोलिस पथक तैनात करण्यात आले आहेत. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा च्या कारणास्तव हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पाकिस्तान आणि भारतामधील वाढता तणाव लक्षात घेता देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांना अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला देखील असाच अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळी पोलिसांचा बंदोबस वाढवण्यात आला आहे. तसेच जायकवाडी धरणावर येणाऱ्या पर्यटकांना चार दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.