digital products downloads

भास्कर इनसाइट: पाकिस्तानातून झालेल्या यूपीआय, हवाला व्यवहारांद्वारे पकडले 12 हेर; देशद्रोह्यांपर्यंत अशा पोहोचल्या गुप्तचर संस्था

भास्कर इनसाइट:  पाकिस्तानातून झालेल्या यूपीआय, हवाला व्यवहारांद्वारे पकडले 12 हेर; देशद्रोह्यांपर्यंत अशा पोहोचल्या गुप्तचर संस्था

  • Marathi News
  • National
  • 12 Spies Caught Through UPI, Hawala Transactions From Pakistan; This Is How Intelligence Agencies Reached Out To Traitors

पवन कुमार | नवी दिल्ली37 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • सैन्य हालचालींची माहिती, फोटो, व्हिडिओ पाठवले

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अटक केलेल्या १२ पाकिस्तानी हेरांपर्यंत गुप्तचर संस्था कशा पोहोचल्या? या प्रश्नाचे उत्तर धक्कादायक आहे. या एजन्सींशी संबंधित सूत्रांनी दिव्य मराठीला सांगितले की, भारताने ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले तेव्हा घाबरलेल्या पाकिस्तानने भारतातील आपले सर्व हेर सक्रिय केले. त्यांनी सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारे भारतीय लष्करी ठिकाणे, लष्कराच्या हालचाली, लष्करी तळ, हवाई तळ यांबद्दल संवेदनशील माहिती मिळवण्याची प्रक्रिया वाढवली. यासाठी त्यांना पेपल पेमेंट अॅप, ऑनलाइन जुगार अॅप, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, हवाला, यूपीआय व क्रिप्टोकरन्सीद्वारे पाकिस्तानकडून २० हजार ते एक लाख रु. मिळाले. युद्धबंदीनंतर लढाईवेळी सतत सक्रिय व आयएसआय संपर्कातील सोशल मीडिया अकाउंट्स व फोन नंबर भारतीय गुप्तचर संस्थांच्या रडारवर आले

सूत्रांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या हवाला, यूपीआय व बिटकॉइन व्यवहारांची माहिती डार्कवेबवर आढळली. या व्यवहारांच्या तपासात पाकिस्तानी हेर ज्योती मल्होत्रा, अरमान, देवेंद्रसिंग ढिल्लन, मोहंमद मुर्तजा अली, सुखप्रीतसिंग, करणबीरसिंग, नोमान इलाही, हारून, तुफैल, सुखदेवसिंग गोहिल, शहजाद आणि मोतीराम जाट यांची माहिती समोर आली. गृह मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली. कारवाईत थोडासाही विलंब झाला तर हेर पळून जाण्याची शक्यता होती, म्हणून ज्या राज्यातील हेर होता, त्या राज्यातील तपास यंत्रणेला त्यांना पकडण्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, या १२ जणांसह १५ हेर पकडले गेले.

ज्योती मल्होत्रा : हिसारची यूट्यूबर पाक अधिकारी दानिशच्या संपर्कात होती. आयएसआयने दानिश-ज्योतीद्वारे लष्करी हालचालींची माहिती मिळवली. तिच्या बँक खात्यांत ऑनलाइन पेमेंट दिसले. तिने ऑनलाइन जुगार अॅप्समधून पैसे काढले होते. मनी ट्रेलवरून हे पैसे पाकिस्तानमधून येत असल्याचे उघड झाले. तिने हवाला, रोख रक्कम व यूपीआय द्वारे अनेक पेमेंट केले. गजाला : दानिशच्या संपर्कात होती. तिने पाकिस्तानला बरीच माहिती पाठवली. दानिशने यूपीआयने तिला अनेक पेमेंट केले. अरमान : याने व्हॉट्सअॅपद्वारे आयएसआयच्या स्थानिक कनेक्शनला संवेदनशील माहिती दिली. तारीफ : हाही नुहचा आहे, तो ऑपरेशन सिंदूरदरम्यान दानिशच्या संपर्कात होता. देवेंद्र ढिल्लन : हनीट्रॅपमध्ये अडकला. ऑपरेशन माहिती पाकिस्तानी मुलीला दिली. मोहंमद मुर्तजा : याने टीव्ही चॅनेलवरून सैन्याच्या हालचालींबद्दल माहिती गोळा करून त्याने तयार केलेल्या अॅपद्वारे आयएसआयला पाठवली. यासीन मोहंमद : हाही ऑपरेशनदरम्यान दानिशच्या संपर्कात. सुखप्रीतसिंग : भारतीय सैन्याचे फोटो, व्हिडिओ एका पाकिस्तानी ऑपरेटरला पाठवत होता. याला हवालाद्वारे पाकिस्तानी एजंटकडून १ लाख रु. मिळाले. करणबीरसिंग : आयएसआयच्या संपर्कात होता. पंजाब, हिमाचल, जम्मू- काश्मीरमधील सैन्याच्या हालचालींबद्दल माहिती याच्यामार्फत पाठवली. हवालाने ५०,००० रु. मिळाले. तेवढेच मिळणार होते. शहजाद : आयएसआयला माहिती दिली. पाकिस्तानी पेपल अॅपवरून पैसे मिळाले. नोमान इलाही : याने ऑपरेशनदरम्यान फोनद्वारे पाकिस्तानी एजंटला सैन्याच्या हालचालींची माहिती दिली. पाककडून यूपीआयद्वारे पैसे दिले गेले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp