digital products downloads

भास्कर ग्राउंड रिपोर्ट: पहलगाम हल्ल्यानंतर 60% घटले वैष्णोदेवीचे भाविक… 2,000 रु.ची खोली 500 रुपयांत

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:  पहलगाम हल्ल्यानंतर 60% घटले वैष्णोदेवीचे भाविक… 2,000 रु.ची खोली 500 रुपयांत

  • Marathi News
  • National
  • Vaishno Devi Devotees Down 60% After Pahalgam Attack…• Rs 2,000 Room For Rs 500

मुदस्सीर कुल्लू | रियासी1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

(जम्मू-काश्मीर)२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात असलेल्या श्री माता वैष्णोदेवी मंदिरात गेल्या एका महिन्यात भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे.या तीर्थक्षेत्री उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये दररोज ३५,००० हून अधिक भाविक येतात, ज्यामुळे दर महिन्याला १० ते ११ लाखांपर्यंत ही संख्या पोहोचते. परंतु हल्ल्यानंतर ही संख्या दररोज ८,००० ते ११,००० पर्यंत मर्यादित राहिली आहे. गेल्या २८ दिवसांत केवळ २.५ लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे, जी सामान्य आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेष म्हणजे, माता वैष्णोदेवी मंदिर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणापासून सुमारे २०० किलोमीटर दूर असले तरी, याचा थेट परिणाम भाविकांच्या ये-जा करण्यावर झाला आहे.श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाचे सीईओ अंशुल गर्ग यांनी सांगितले की, भाविकांची संख्या हळूहळू वाढत आहे. हल्ल्यानंतर मोठी घट झाली होती, परंतु आता भाविक पुन्हा येऊ लागले आहेत. आम्ही त्यांना मोफत सुविधा देत आहोत, जसे की, मोफत आरती दर्शन, मोफत निवास आणि सुरक्षा व्यवस्था. त्यांनी सांगितले की, कटरा ते भवनपर्यंत सीसीटीव्ही निगराणी, पोलिस आणि सीआरपीएफची तैनाती आहे.

हॉटेलच्या ६ हजार खोल्यांपैकी २०-३० टक्केच भरलेल्या

हॉटेल, स्थानिक सेवेत मोठी सवलत :हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन कटराचे अध्यक्ष राकेश वझीर यांच्या मते, गेल्या पाच दिवसांत भाविकांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. हॉटेलच्या खोल्यांवर ४०% ते ६०% पर्यंत सूट दिली जात आहे. ज्या खोल्या आधी १,५०० रुपयांना मिळत होत्या, त्या आता ५०० ते ७०० रुपयांना उपलब्ध आहेत. कटरामध्ये ३०० हॉटेल आणि गेस्ट हाऊस आहेत, ज्यात ६,००० खोल्या आहेत, परंतु सध्या केवळ २० ते ३०% खोल्या भरलेल्या आहेत.भाविकांच्या कमतरतेमुळे स्थानिक रोजगारावरही परिणाम झाला आहे. घोडेवाले (पोनीवाला) बशीर अहमद यांनी सांगितले की, कटरा ते भवनपर्यंत घोड्याची सवारी जी आधी ७०० रुपयांना होती, ती आता ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp