
- Marathi News
- National
- 1.6 Million People In 17 States Face Difficulty In Getting Married; Graduate Girl Marries Migrant Worker
मनीष लाखन/आशिष चौहान/सुनील हुकरे6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
सिकलसेल ॲनिमियाविरोधातील सर्वात मोठे अभियान सुरू आहे. १७ राज्यांतील ७ कोटी लोक, विशेषत: आदिवासी समाजात पिढ्यान््पिढ्या होणाऱ्या या आजाराची तपासणी होत आहे. ५ कोटी लोकांची पूर्णही झाली. १६ लाख लोकांत आजार किंवा त्याची लक्षणे आहेत. त्यांना जागरूक केले जात आहे, जेणेकरून हा आजार पुढील पिढीपर्यंत पोहोचू नये. ‘रुग्ण-रुग्ण आपसात विवाह करू शकत नसले तरी सामान्य व्यक्ती कोणत्याही रुग्णाशी विवाह करू इच्छित नाही, तर समाजात नाती कशी निर्माणे होणार?’ दैनिक भास्करने या समस्येचा सामना करणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अशा भागांत विवाह जुळवण्यासंदर्भात सिकलसेलच्या रुग्णांवर आलेल्या या संकटाचा अभ्यास केला जेथे ॲनिमियाचे रुग्ण जास्त संख्येने सापडतात.
राजस्थान: समाजापासून लपवून दूर गावांमध्ये स्थळांचा शोध : बांसवाडा जिल्ह्यातील सज्जनगड ब्लॉकच्या रमाबाईंच्या ८ अपत्यांपैकी ४ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यात २ मुली आहेत. वडील म्हणतात, ‘आम्ही आजार लपवून दूर गावात मुलीचे लग्न लावू. नाहीतर कोण मुलगा लग्न करेल.’ या जिल्ह्यात ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३१५६ रुग्ण-वाहक सापडले होते.
इकडे, कुशलगढच्या अनिता सरकारी कर्मचारी आहेत. स्वस्थ आहेत, पण त्रास जिवंत असेपर्यंत संपणारा नाही. त्यांचा १८ वर्षांचा मुला सिकल सेल आजरासाठी त्यांना दोषी ठरवतो. वास्तविक अनिता, तिचा पती दोघेही आजाराचे वाहक आहेत. तथापि, अशा प्रकरणांत अपत्य रुग्ण ठरण्याची शक्यता २५% असते. दुर्दैवाने मुलगा बाधितच जन्मला. अशाप्रकारे पश्चिम राजस्थानातील प्रमिला (नाव बदलले) सिकल सेलची वाहक आहे. तिच्यात आजाराची लक्षणे आहेत. आईवडिलांना स्थळ शोधण्यात खबरदारी घ्यायची आहे. कारण सिकल सेल रुग्ण आपसात विवाह करू शकत नाहीत. वाहकही सामान्य व्यक्तीशी लग्न करू शकला तर ठीक. आईवडील चिंतातुर आहेत की समाजातील लोक सिकल सेल कार्ड बघून विवाह करत आहेत. तर त्यांच्या मुलीशी कोणता सामान्य मुलगा लग्न करेल?
छत्तीसगड: १००० युनिट रक्त दिले, एमकॉम मुलगी अविवाहित : एमकॉम शिकलेली राजनांदगाव्याची मधू जन्मत: रुग्ण आहे. ३१ वर्षांची होईपर्यंत १००० युनिट रक्त दिले गेले. गाव-समाजाला माहिती आहे की डोनर आणि औषधांवर तिचे जीवन अवलंबून असल्याने लग्न जुळत नाही. अशीच स्थिती शालिनीची होती. शिक्षक पालकांनी ग्रॅज्युएट मुलीचे लग्न स्थलांतरित मजुराशी केले. पण उपचारांअभावी तिचा वर्षभरात मृत्यू झाला. जिल्ह्यात ६ लाखांपैकी ६५९ रुग्ण व १०,१३७ वाहक सापडले.
मध्य प्रदेश माहिती कळली तर नाती जुळणार नाहीत
खंडालाचे खुमसिंह, पत्नी, मुलगी पॉझिटिव्ह निघाले. पण कोणालाच सांगितले नाही. ते म्हणतात, ‘माहिती कळल्यास िववाह जुळणार नाही.’ एमएस्सी झालेल्या मिंडलच्या रमिला म्हणतात, ‘आधी सांगितले नाही तर लग्नानंतर सोडून देतील.’ झाबुआत २०२१ पासून ७.६३ लाख तपासण्यांत १२४८ रुग्ण, १४,४४२ वाहक.
असा आजार ज्यात सरकार सांगते, कुठे लग्न करायचे कुठे नाही…, समाजातील या स्थितीवर ३ राज्यांतील अहवाल
काय आहे सिकलसेल ॲनिमिया….
सामान्यतः प्रत्येक सुदृढ व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशी गोल, मऊ, लवचिक असतात. त्यांचा आकार अर्धगोलाकार, कठोर होतो, तेव्हा त्याला सिकलसेल म्हणतात. हे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे शरीरात रक्त कमी निर्माण होते. म्हणूनच याला सिकलसेल ॲनिमिया म्हणतात. हा आनुवंशिक आजार आहे. वेळेत निदान, उपचार झाल्यास दीर्घायुष्य जगता येते.
छत्तीसगड: 1.38 कोटी स्क्रीनिंग.3.14 लाख वाहक. 24,777 रुग्ण. राजस्थान: 35.58 लाख तपासण्या। 7,914 सिकलसेल लक्षणाचे, 2,858 रोगग्रस्त सापडले. म.प्र.: 75.94 लाख स्क्रीनिंग। यात 1.54 लाख वाहक, 23,702 रुग्ण.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.