
छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचा फैसला अचानक झालेला नाही. भुजबळांचं मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी वेगळीच आहे. भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात घेण्यासाठी अनेक दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. यासाठी काही बैठकाही झाल्या. काय झाल्या या बैठका आणि कशी लिहिली गेली भुजबळांची परतीची स्क्रिप्ट यावर झी 24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट…
भुजबळांच्या मंत्रिपदाचा 8 दिवसांपूर्वीच फैसला
शपथविधीसाठी वार ठरला मंगळवार
भुजबळांच्या परतीची इनसाईड स्टोरी
मुलुखमैदान तोफ म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळांची महायुतीच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. पण भुजबळ महायुतीच्या पहिल्या सरकारमध्येही होते. पण दुस-या सरकारमध्ये भुजबळांचा समावेश नव्हता. महायुती सरकारच्या शपथविधीच्या पहिल्या दिवसापासून भुजबळांचा फडणवीस सरकारमध्ये समावेश करावा यासाठी भुजबळ समर्थकांचा सरकारवर सातत्यानं दबाव होता. दरम्यानच्या काळात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचं मंत्रिपद भुजबळांना द्यावं अशी मागणी होत होती. पण त्यावरही काहीच झालं नाही.
– 15 दिवसांपूर्वी भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय झाला
– 8 दिवसांपूर्वी भुजबळांच्या मंत्रिमंडळ समावेशावर चर्चेसाठी बैठक झाली
– भुजबळांच्या शपथविधीची तारीख निश्चित झाली
– सुरुवातीला सोमवारी शपथ घेण्याबाबत विचार झाला
– शपथविधीसाठी मंगळवारच योग्य असं बैठकीत ठरलं
– कॅबिनेट असल्यानं इतर मंत्र्यांची उपस्थिती राहील म्हणून मंगळवार ठरला
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर भुजबळांच्या सगळ्या बॅनरवरुन अजित पवारांच्या फोटोंना कात्री लावण्यात आली होती. पण भुजबळ मंत्रिमंडळात येणार म्हटल्यावर त्यांच्या खास समर्थकांना फोन गेले. बॅनरवर पुन्हा अजित पवारांचे फोटो लावण्याचे आदेश गेल्याचं सांगण्यात येत आहे.
छगन भुजबळांनी काही दिवसांपूर्वी जहा नही चैना वहाँ नही रैना असा शेर अजित पवारांचा नामोल्लेख टाळून ऐकवला होता. आता भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी भुजबळांच्या डायलॉगची परतफेड केली आहे.
छगन भुजबळ हे कॅबिनेटमध्ये असावेत असा महायुतीच्या अनेक नेत्यांचा आग्रह होता. आता भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. भुजबळांसारखा आक्रमक चेहरा महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आल्यानं आता सरकारच्या आक्रमकपणाला आणखी धार आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.