
मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी मला विश्वासात घेतले नाही. मला त्याबाबतची कल्पना दिली नसल्याचे ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तर तुम्हाला कल्पना द्यायला तुम्ही सरकारचे बाप आहात का? असा सवाल मनोज जरांग
.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरवरून ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. काढलेला जीआर हा प्रचंड दबावाखाली काढल्याचा दावा करत त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक 8 पानी पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी ‘मराठा समाज’ या शब्दावर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाचा उल्लेख ओबीसी किंवा कुणबी अथवा मराठा – कुणबी किंवा कुणबी – मराठा असा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आता यावरून मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
नेमके काय म्हणाले मनोज जरांगे?
तुम्हाला कल्पना द्यायला तुम्ही सरकारचे बाप आहात का? अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तिथे संविधानाच्या पदावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आहेत. हे सर्व वेडे, त्यांना अक्कल नाही आणि तुम्ही एकटेच शहाणे, तुम्हाला एकट्याला अक्कल आहे का? असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला.
भुजबळांना तुरुंगात पाठवण्याची मागणी
आता सरकारने छगन भुजबळ यांच्या म्हणण्यावर कायदा चालवायचा का? तुम्ही एकटे सरकारला वेठीस धरत आहात का? असे प्रश्नही मनोज जरांगेंनी उपस्थित केले. देवेंद्र फडणवीसांनी भुजबळ यांना तुरुगांत पाठवले पाहिजे, अन्यथा ते सगळ्या सरकारला डाग लावतील, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
सर्वकाही सुरळीत, भुजबळ अडथळा आणताय
मराठा समाजाचे आणि सरकारचे सर्व काही चांगले होत आहे. पण छगन भुजबळ ते होऊ देणार नाही. जीआरला हात लावल्यास सरकारला शांत बसू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
हे ही वाचा…
सरकारने मराठा आरक्षणाचा GR प्रचंड दबावाखाली काढला:भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना 8 पानी पत्र; ‘मराठा समाज’ या शब्दावरच घेतला आक्षेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित काढलेला जीआर हा प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप राज्यातील एक बडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना एक 8 पानी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपल्या समाजाचे म्हणणे विस्तृतपणे मांडले आहे. विशेषतः त्यांनी सरकारच्या जीआरमधील ‘मराठा समाज’ या शब्दावर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाचा उल्लेख ओबीसी किंवा कुणबी अथवा मराठा – कुणबी किंवा कुणबी – मराठा असा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे या प्रकरणाचा वाद एक वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.