digital products downloads

भूमका बाबा देवस्थान चैत्र महिन्यात खुले: वन विभागाचा बंदीचा निर्णय मागे, खासदार बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीने तोडगा – Amravati News

भूमका बाबा देवस्थान चैत्र महिन्यात खुले:  वन विभागाचा बंदीचा निर्णय मागे, खासदार बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीने तोडगा – Amravati News



मेळघाटमधील सेमाडोहजवळील आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले भूमका बाबा देवस्थान चैत्र महिन्यात नेहमीप्रमाणे खुले राहणार आहे. वन विभागाने यावर्षी पूजा-अर्चा थांबवण्याचा घेतलेला निर्णय खासदार बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. हे देवस्थान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाने येथे पूजा आणि महाप्रसाद करण्यास मनाई केली होती. या निर्णयामुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती, कारण हे देवस्थान त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे केंद्र आहे. आदिवासी बांधवांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे तक्रार करून चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर खासदार वानखडे यांनी तातडीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी आणि उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला मेळघाटमधील आदिवासी प्रतिनिधी आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांशी झालेल्या चर्चेअंती, भूमका बाबा देवस्थानच्या यात्रेवरील बंदी स्थगित करण्याचा आणि चैत्र महिन्यात हे क्षेत्र खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सकारात्मक चर्चेमुळे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले. भूमका बाबा देवस्थान हे अमरावती, बैतुल आणि खंडवा (मध्यप्रदेश) येथील आदिवासी व गैरआदिवासी बांधवांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक मन्नत मागण्यासाठी येतात. या बैठकीला माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्रसिंग गैलवार, राजेश सेमलकर, विलास बोरेकर, पंकज मोरे, राहुल येवले, गोलू मुंडे आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भूमका बाबा देवस्थान आठवड्यातून केवळ एक दिवस दर्शनासाठी खुले केले जात होते. आता चैत्र महिन्यात ते पूर्णपणे खुले राहणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp