digital products downloads

भोंदूंच्या मागे लागण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन चांगले: तुषार भोसले यांची रुपाली चाकणकरांवर टीका; आधी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला – Mumbai News

भोंदूंच्या मागे लागण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन चांगले:  तुषार भोसले यांची रुपाली चाकणकरांवर टीका; आधी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला – Mumbai News


तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणाने आता स्पष्टपणे राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरा

.

फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, काही दिवसांपूर्वी तुम्ही महिलांना पोथी-पुराणात अडकवून ठेवले जाते असे सांगत होतात. मात्र, अशा भोंदूंच्या मागे लागण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन आणि त्यांचे आचरण करणे कितीतरी चांगले आहे, असे म्हणत त्यांनी थेट हल्ला चढवला.

भोसले यांनी पुढे असेही नमूद केले की, समाजाला उपदेश देण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तीने अशा वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे.

दरम्यान, अशोक खरातसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटताना दिसत आहेत.

या संबंधीत खालील बातम्या देखील वाचा…

अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ; आंदोलनाचा इशारा

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा? अशोक खरातवर संशयाची सुई:देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू; काळ्या जादूचा आरोप, तपासाची मागणी

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial