digital products downloads

भोंदू खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती: अमृता फडणवीस यांचे रोखठोक मत; कारवाई करण्यात विलंब झाल्याची खंत – Maharashtra News

भोंदू खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती:  अमृता फडणवीस यांचे रोखठोक मत; कारवाई करण्यात विलंब झाल्याची खंत – Maharashtra News



भोंदू अशोक खरात प्रकरणात यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. असे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे जीवन वाचले असते, असे रोखठोक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याला आज नाशिक येथील एका कोर्टापुढे हजर केला असता कोर्टाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे तो आता 1 एप्रिलपर्यंत कोर्टातच राहणार आहे. तूर्त त्याच्या काळ्या कारवायांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी झी 24 तासच्या एका कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या, अशोक खरात प्रकरण खूपच भयानक आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. कोणत्याही बाबांवर डोळे बंद करून विश्वास ठेवणे योग्य नाही. आपण आंधळा विश्वास ठेवतो तेव्हा आपला घात होतो. आपल्याला डोळे उघडे ठेवून जगणे आवश्यक आहे. आपण आपल्या ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे. सर्वकाही आपल्या आत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याकडून अशा बाबा बुवाबाजीला प्रोत्साहन देऊ नका. असे पुढे आपल्यावर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. सरकार याविरोधात आपल्याला मदत करेलच. प्रकरण खूप अगोदरच उजेडात यायला हवे होते पत्रकारांनी यावेळी त्यांना अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस कारवाई करत प्रकरण मूळापर्यंत नेल्यासंबंधीचा प्रश्न केला. त्यावर अमृता म्हणाल्या, या प्रकरणी गर्व वाटण्याची काहीच गरज नाही. कारण, एवढे काही झाल्यानंतर हे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचले. ते अगोदरच त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तसे झाले असते तर बऱ्याच गोष्टी टाळता आल्या असत्या. अनेक स्त्रियांचे आयुष्य वाचले असते. देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रकरण आल्यानतंर त्यांच्यावर कारवाई केली, पण हे खूप अगोदरच व्हायला हवे होते, असे त्या म्हणाल्या. श्रद्धा व अंधश्रद्धा काय असते?

अमृता फडणवीस या प्रकरणी श्रद्धा व अंधश्रद्धेचा फरक स्पष्ट करताना म्हणाल्या, श्रद्धा आपल्या विचारांवर असते. आपल्या वेदांवर आपली श्रद्धा असते. चांगलेपणावरही असते. तुम्ही घरी बसून फळ पाहिजे म्हणून कुणाकडे गेलात व त्यासाठी शॉर्टकटमध्ये जे करता ती अंधश्रद्धा आहे. श्रद्धा स्वतःच्या आतून निघते. तुम्ही वेद, गीता, महाभारत वाचले आहे. तिथे खऱ्या जीवनातील शिकवण आहे. आपण कसे वागलो तर काय होऊ शकते याचे पाठ त्यात आहेत. आपल्याकडे सर्वच गोष्टी आहेत. हे सर्व वाचल्याने आपल्या जीवनात अधिक स्पष्टता येऊ शकते. श्रद्धा व अंधश्रद्धेत एकच फरक आहे. आपण आपल्या भविष्याविषयी अनिश्चित असतो तेव्हा आपण इथे-तिथे पाहतो. पण जेव्हा आपल्या मनात ठाम विश्वास असतो, तेव्हा सातत्याने मेहनत करकोत. आपल्या आदर्शांच्या मार्गावर चालत राहिलो, तर अशा कोणत्याही बुवाबाबांची गरज भासत नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp